For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपस्माराबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज

07:00 AM Nov 17, 2022 IST | Tarun Bharat Portal
अपस्माराबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज
Advertisement

आज जागतिक अपस्मार दिन असून, त्यानिमित्त...

Advertisement

अलीकडे चालत्या-बोलत्या माणसाचा अचानक तोल जातो. त्याला झटके येतात, फेफरे येते, अशा घटना आपण अनेकदा पाहतो. ही सर्व अपस्माराची लक्षणे आहेत. अपस्मार म्हणजे काय? त्याबद्दलचे गैरसमज व झटका आल्यास काय करावे? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मानवी मेंदू लक्षावधी चेतापेशींचा बनलेला असतो. चेतापेशी विद्युत व रासायनिक संदेशाद्वारे संवाद साधतात. त्यांच्यामध्ये काही बिघाड झाल्यास अचानक विद्युत उत्सर्जन होऊ लागते व मेंदूचे कार्य बिघडते. त्यालाच झटक्मयांचा विकार असे म्हटले जाते. हे झटके येताना माणूस बेशुद्ध होऊन जमिनीवर पडू शकतो व जोरजोरात हिसके देऊ लागतो. काही काळानंतर ती व्यक्ती पुन्हा सामान्यांप्रमाणे वागू लागते. अपस्मार कोणत्याही वयात आणि कोणालाही होऊ शकतो. भारतात 1 कोटी लोक या विकाराने त्रस्त आहेत.

Advertisement

अपस्मारचे काही प्रकार अनुवंशिक असतात. किंवा अपघात आणि खेळात झालेल्या इजेमुळे मेंदूवर आघात होणे, मेंदूज्वर, एट्स व विषाणूजन्य मेंदूचे अन्य विकार, प्राणवायूची कमतरता, आईला संसर्ग होऊन तो बाळाकडे येणे अशी कारणे होऊ शकतात.

बऱयाचदा औषध न घेणे किंवा प्रतिबंधक औषधांसोबत अतिरिक्त औषध घेणे हे एक कारण असू शकते. किंवा ताण, उत्सुकता, भावनिक स्थिती, अपुरी झोप, ताप अनियमित ऋतुचक्र ही अंतर्गत तर मद्य, धूम्रपान व निकृष्ट आहार, अतिशय गरम पाण्याने आंघोळ ही बाहय़ कारणे असू शकतात.

गोंधळ होणे, तेजोवलय, अचानक कोसळणे, रोखून पाहणे, शुद्ध किंवा जाणीव हरपणे, शरीर थरथरणे ही याची लक्षणे आहेत. अशा वेळी त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. या झटक्मयाचे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये अनुक्रमे पूर्ण मेंदूवर परिणाम होऊन व्यक्ती बेशुद्ध पडते. मेंदूचा एक भाग प्रभावीत होतो व जाणीव नाहीशी होऊ शकते. मधुमेह, अतिताप हे कारण असू शकते. शुन्यात पाहत राहणे आणि प्रतिसाद देणे हे सुद्धा अपस्माराचे लक्षण आहे.

काय झाले हे रुग्णाला सांगता येत नाही. अशा वेळी त्याच्यासोबतची व्यक्ती ही माहिती देऊ शकते. त्या व्यक्तीने रुग्णाच्या सर्व हालचाली व लक्षणे डॉक्टरांना दिली पाहिजेत. हा सर्व तपशील घेऊन डॉक्टर निदान करू शकतात. अशा वेळी डॉक्टर चेतासंस्थेची चाचणी, रक्त चाचणी, ईईजी म्हणजे मेंदूतील विद्युत कार्याची नोंद, सीटीसी म्हणजे रक्ताच्या गाठी, गळू, व्रण वगैरे तसेच एमआरआय अशा चाचण्या सुचवितात.

अपस्मार औषधांनी नियंत्रित करता येते. मात्र ती वेळेवर घ्यावीत व अचानक थांबवू नयेत. अपस्मार प्रतिबंधक औषधांमुळे कदाचित थकवा येणे, पुरळ येणे, वजन वाढणे, हाडे ठिसुळ होणे, स्मरणशक्ती व विचाराच्या समस्या, अधिक तीव्र परिणामामुळे आत्महत्येचे विचार, शरीराचा दाह होणे, नैराश्य येणे अशीही कारणे असू शकतात.

अपस्मार विकारावर शस्त्रक्रियाही केली जाते. मेंदूच्या ज्या भागामध्ये झटका निर्माण झाला आहे तो भाग काढून टाकला जातो किंवा त्यात बदल केला जातो. अंशतः छेद देऊन शस्त्रक्रिया केली जाते. या शिवाय एआयटीटी व अन्य शस्त्रक्रिया आहेत.

झटका आल्यास सर्वप्रथम त्या व्यक्तीला शांत करून सुरक्षित ठेवणे, झटका थांबतो का हे पाहणे, झटक्मयाची वेळ मोजणे, व्यक्तीला कुशीवर वळविणे, मोकळी हवा येऊ देणे, डोक्मयाखाली आधार देणे, मानेभोवतीचे कपडे सैल करणे, अपायकारक वस्तुंपासून त्याला लांब नेणे, त्याच्या तोंडात काहीही न ठेवणे असे प्रथमोपचार आपल्याला करता येतात.

पाण्यात असताना झटका आल्यास त्या व्यक्तीचा चेहरा तिरका करावा, त्याची नाडी सुरू आहे का पाहावी, तोंडाने श्वास द्यावा, पोहणे थांबवावे आणि डॉक्टरांकडे न्यावे.

विमानात झटका आल्यास व्यक्तीचे डोके एका कुशीवर वळवून आडवे झोपवावे, श्वास घेण्यासाठी मोकळी हवा येऊ द्यावी, झटका पाच मिनिटांहून अधिक काळ राहिला तर साहाय्यकाला बोलवावे व डॉक्टरांची व्यवस्था करावी. लहान मुलांना ताप, डोक्मयाला इजा होणे, मेंदूला संसर्ग होणे, मेंदूला प्राणवायू न मिळणे अशी अन्य कारणेही असू शकतात. याबाबत मुलांना व त्यांच्या शिक्षकांचे समुपदेशन करावे. त्यांच्यावर ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी.

अपस्मार झालेली मुले खेळामध्ये व शारीरिक कार्यात सहभागी होऊ शकतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मात्र, अपस्मारीग्रस्त मुलाने कोणताही खेळ खेळण्यापूर्वी शिक्षक आणि डॉक्टरांशी चर्चा करावी. त्या मुलाला हेल्मेट वापरण्याची सूचना करावी, हे महत्त्वाचे. अपस्मारग्रस्त व्यक्ती वाहन चालविणार असेल तर सोबत दुसरी व्यक्ती असणे आवश्यक.

गर्भवती महिलांना जर झटका येत असेल तर गर्भाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी वेळेत डॉक्टरांना दाखवून आहार आणि व्यायामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. अशा महिलांनी दुग्धपान करतानासुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

-डॉ. रविराज घोरपडे, एमसीएच न्युरो-निम्हान्स, लेकह्यू हॉस्पिटल, बेळगाव.

Advertisement
Tags :

.