महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अजून ग्रहण सुटलेले नाही

01:59 AM Apr 13, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने
उसळी मारली निफ्टीने 9 हजाराचा पल्ला ओलांडला आणि सेन्सक्सनेही तीस हजाराचा टप्पा ओलांडला.
निफ्टीत 363 अंकांची आणि सेन्सक्समध्ये 1265 अंकांची तेजी आली. यामुळे कोरोनाचा विळखा
संपूर्ण जगाला पडला असला तरी शेअर बाजारात अच्छे दिन परतले की काय असे वाटण्याची शक्मयता
आहे. पण एवढय़ाने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण शेअर बाजाराचा कल अजूनही मंदीचाच
आहे हे ध्यानात घ्या.

Advertisement

अनेक आठवडे नकारात्मक
कल दर्शवणाऱया भारतीय शेअर बाजाराने गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी चांगलीच उसळी
मारली. यामुळे आता शेअर बाजारांना लागलेले मंदीचे ग्रहण सुटले असा समज झाला असेल तर
भानावर या. कारण शेवटच्या दिवशी शेअर बाजारांनी उसळी मारलेली असली तरी पुढील आठवडय़ात
बाजारांचा कल हा मंदीचाच आहे हे ध्यानात ठेवायला लागेल.

Advertisement

आपल्या देशात कोरोना
विषाणूमुळे पसरलेल्या कोविड-19 या आजाराच्या साथीचा प्रवास अपेक्षेप्रमाणे होत आहे.
संपूर्ण जगाच्या तुलनेत भारताची परिस्थिती खूपच बरी आहे. अमेरिका, इटली, फ्रान्स, इंग्लंड,
जर्मनी या सगळय़ा प्रगत देशांनी कोरोनापुढे हात टेकले आहेत. भारताची लोकसंख्या प्रचंड
असूनही जितक्मया वेगाने हा आजार आपल्याकडे पसरेल असे वाटत होते, तितक्मया वेगाने तो
पसरलेला नाही. कदाचित त्याबद्दलचा दिलासा शेअर बाजारांनी व्यक्त केला असेल.

निफ्टी आणि सेन्सक्समध्ये अतिविक्री झाल्यामुळे ही तात्पुरती
तेजी आली आहे. पण बाजारांतील अस्थिरता अजूनही कमी झालेली नाही. पुढील आठवडय़ाची सुरूवात
कदाचित स्थिरतेने होईल. पण लगेच दुसऱया दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने
बाजार बंद असणार आहे. आठवडय़ाच्या सुरूवातीला स्थिर सुरूवात झाली तरी पुढील वाटचाल ही
कोरोनाचा विळखा किती सैल होतो यावर अवलंबून असणार आहे.

कोविड-19 मुळे संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था ठप्प झाली
आहे. कोटय़वधी लोकांचा रोजगार गेला आहे, उद्योगधंदे बंद झाले आहेत आणि सर्वात महत्वाचे
म्हणजे प्रगत देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तरीही भारतीय बाजारांत
जे घडले तेच आंतरराष्ट्रीय बाजारांत घडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांनी तेजीचा कल दाखवला
नसला तरी त्यांची घसरणही काहीशी मंदावली आहे.

याचे महत्वाचे कारण म्हणजे अमेरिकन सरकारने जाहीर केलेले
आर्थिक पॅकेज. उद्योगधंद्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला दिलासा
मिळाला आहे. 

भारतातही तेच झाले आहे. इथेही सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर
केले आहे आणि आगामी काळात आणखी एक पॅकेज जाहीर होण्याची शक्मयता आहे. सरकारने उचललेली
पावले अतिशय समर्थनीय आहेत. संपूर्ण देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय धाडसाचा
होता आणि तो मोदी सरकारने घेतला. आता देशात वाढणाऱया कोरोना रूग्णांची संख्या पाहता
आणि लॉकडाऊन हाच हा आजार रोखण्याचा एकमेव पर्याय असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढला
तरी लोक तो सकारात्मकतेनेच घेतील असेच चित्र आहे. याचा एकूण परिणाम बाजारांवर होऊन
बाजारांतही सकारात्मकता दिसून येईल.

मात्र असे असले तरी बाजार अजूनही प्रचंड दबावाखाली आहेत.
9 हजारांच्या स्तरावर निफ्टी तग धरून राहील अशी अपेक्षा आहे. 9200 ते 9500 दरम्यान
निफ्टीत रेजिस्टन्स म्हणजे रोधकता येईल आणि 9 हजार आणि 8700 च्या दरम्यानच्या पातळीवर
निफ्टीला समर्थन मिळू लागेल.

सध्या गुंतवणूकदार गोंधळलेल्या मन:स्थितीत आहे. शेअर बाजरांची
कनि÷तम
पातळी गाठली गेली की आगामी महिन्यांत ते आणखी खाली जातील असा संभ्रम त्यांच्या मनात
आहे. मोठय़ा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा धोका त्यांना पत्करायचा नाही आणि मध्यम तसेच
लहान कंपन्यांच्या शेअर्सच्या आश्वासकतेबाबत त्यांच्या मनात साशंकता आहे. पण आश्चर्याची
बाब अशी आहे की या अस्थिरतेच्या काळात या मध्यम आणि लहान शेअर्सनीच शेअरबाजारांची शान
टिकवून ठेवली आहे.

कोरोना महामारीत मध्यम आणि लहान कंपन्या टिकणार नाहीत
अशी भीती व्यक्त केली जाते. कारण संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात लहानमोठे सगळेच उद्योगधंदे
पूर्णपणे ठप्प झालेले असतात. तरीही गुंतवणूकदार लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांवर
मदार ठेवून आहेत कारण या संकटातून सरकार या कंपन्यांना मदतीचा हात देईल अशी खात्री
गुंतवणूकदारांना आहे. अर्थात अशा प्रकारची गुंतवणूक दीर्घकालीन असणार हे उघड आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर येणारी मंदी आणि त्यामुळे कच्च्या
तेलाच्या दरांत होणारी घसरण भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. भारत पेट्रोलियम, सिएट,
ऍव्हेन्यू सुपरमार्ट्स, हॅवेल्स इंडिया, आयसीआयसीआय बँक, ज्युबिलन्ट फूडवर्क्स, महिंद्रा
अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स सध्या घसरलेले आहेत. पण या सर्वच कंपन्यांचे फंडामेंटल्स
चांगले मजबूत आहेत. त्यामुळे येत्या काळात या कंपन्यांकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले
तर आश्चर्य वाटायला नको.

येत्या आठवडय़ात बाजारांत अस्थिरता असणार हे तर स्पष्टच
आहे. पण या अस्थिरतेतही काही कंपन्यांच्या शेअर्सनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे
एकूण बाजारांपेक्षा स्टॉकनिहाय गुंतवणूक, तीही दीर्घकालीन असेल, तर फायद्याची ठरेल.

Advertisement
Tags :
#business#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article