अखेर तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक
वृत्तसंस्था / मुंबई :
चालू आठवडय़ात सलग तीन दिवस घसरणीची संक्रांत मुंबई शेअर बाजारात राहिली होती. परंतु शेवटी गुरुवारी मुख्य कंपन्यांमधील नफा कमाई आणि जागतिक पातळीवरील सकारात्मक वातारवण यामुळे बीएसई सेन्सेक्स 271 अंकानी तेजीत राहिला होता. इन्फोसिस, लार्सन ऍण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक यांच्या समभागात नफा कमाई झाली आहे.
दिवसभरातील व्यवहारात गुरुवारी सेन्सेक्स 300 अंकानी तेजीत राहिला होता तर तो दिवसअखेर 271.02 अंकानी वधारुन निर्देशांक 41,386.40 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात 73.45 टक्क्यांनी घसरण होत निर्देशांक 12,180.35 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभाग 2.98 टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीच्या डिसेंबर तिमाहीचा नफा 15 टक्क्यांनी वधारुन 2,560.32 कोटी रुपयांनी नफ्यात राहल्याची नोंद करण्यात आली आहे. तर अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, स्टेट बँक, टायटन, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीत राहिले होते.
प्रमुख कंपन्यांमधील टेक महिंद्रा, पॉवरग्रिड, टीसीएस, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
अन्य बाबी
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. आशिया बजारातील विविध ठिकाणी झालेल्या घसरणीनंतर समभागात जोरदार खरेदीचे वातारवण राहिले होते. यामुळे भारतीय बाजारात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले आहे.