अंतिम सत्रही घसरणीसोबत बंद
सेन्सेक्स 663 तर निफ्टी 219 अंकांनी नुकसानीत : विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा परिणाम
वृत्तसंस्था / मुंबई
मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबली नसल्याचे दिसून आले आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शुक्रवारी अंतिम सत्रात सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. . बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी तेजीसह खुला झाला होता. मात्र, काही काळानंतर बाजाराला आपली तेजी कायम टिकवण्यात यश आले नाही.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स 662.87 अंकांनी घसरून 0.83 टक्क्यांसह प्रभावीत होत निर्देशांक 79,402.29 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 218.60 अंकांनी घसरून 24,180.80 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी इंडसइंड बँकेचा (इंडसइंड बँक) शेअर सर्वाधिक 18.56 टक्क्यांनी घसरून बंद झाला. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, एनटीपीएस, अदानी पोर्टस्, टाटा स्टील, मारुती, टायटन, बजाज फायनान्स, एसबीआय आणि टाटा मोटर्स यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली.
अन्य कंपन्यांमध्ये दुसरीकडे, बाजारातील घसरणीनंतरही अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, सनफार्मा, कोटक बँक, एचसीएल टेक, टीसीएस, आयसीआयसीआय बँक आणि नेस्ले इंडियाचे समभाग तेजीसोबत बंद झाले.
गेल्या एक महिन्यात सेन्सेक्स 5,767 अंकांनी घसरला. गेल्या महिन्यात बीएसई सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. 25 सप्टेंबर 2024 रोजी सेन्सेक्स 85,169.87 अंकांवर होता आणि आज 79,402.29 अंकांवर बंद झाला. तेव्हापासून सेन्सेक्स 6.77 टक्क्यांनी घसरला.
बाजारातील घसरणीचे कारण?
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले की, भारतीय बाजारातील मोठ्या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची विक्री. याशिवाय भारतीय कंपन्यांच्या, विशेषत: ग्राहकांशी संबंधित क्षेत्रे आणि वित्तीय कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांमुळेही बाजार घसरला आहे. मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे संशोधन आणि सल्लागार विष्णू कांत उपाध्याय, म्हणाले की बाजारातील विक्री मुख्यत: निराशाजनक तिमाही निकाल, परदेशी गुंतवणूकदारांची सतत विक्री यामुळे दोन्ही निर्देशांकात मोठी पडझड राहिली आहे.
बँकिंग क्षेत्रातील समभाग घसरले
बँकिंग क्षेत्रातील समभाग, विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. निफ्टी बँक इंडेक्स 2.1 टक्क्यांनी घसरून 50,440.6 वर आला. ही घसरण प्रामुख्याने इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या समभागांच्या दबावामुळे झाली आहे.