For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबा-काजू नुकसानीपोटी 59 कोटींचे वाटप

06:23 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंबा काजू नुकसानीपोटी 59 कोटींचे वाटप
Advertisement

26 हजार 612 शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :

ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेला सिंधुदुर्ग जिह्यात वेग आला आहे. 24 सप्टेंबर 2026 अखेर जिह्यातील 26 हजार 612 लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर 59 कोटी 23 लाख 45 हजार 945 ऊपये नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे. जिह्यासाठी एकूण 79 कोटी 34 लाख 56 हजार 677 ऊपये अपेक्षित निधी निश्चित करण्यात आला असून, ई-पंचनामा पोर्टलवर 34 हजार 933 लाभार्थ्यांसाठी 76 कोटी 6 लाख 80 हजार 101.74 ऊपये मंजूर झाले आहेत.

Advertisement

जिह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. संबंधित तहसीलस्तरावरून ई-पंचनामा पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा केली जात आहे.

देवगडला सर्वाधिक निधी

तालुकानिहाय विचार करता देवगड तालुक्यासाठी सर्वाधिक 20 कोटी 77 लाख 1 हजार 816 ऊपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 5 हजार 982 लाभार्थ्यांना 14 कोटी 21 लाख 54 हजार 26 ऊपये वितरित झाले आहेत. त्यापाठोपाठ कुडाळ तालुक्यासाठी 12 कोटी 25 लाख 75 हजार 725 ऊपये मंजूर असून, त्यापैकी 10 कोटी 92 लाख 70 हजार 275 ऊपये वितरित करण्यात आले आहेत.

मालवण तालुक्यात 10 कोटी 29 लाख 81 हजार 283 ऊपयांपैकी 7 कोटी 50 लाख 14 हजार 548 ऊपये, तर सावंतवाडी तालुक्यात मंजूर 9 कोटी 88 लाख 22 हजार 515 ऊपयांपैकी 8 कोटी 28 लाख 54 हजार 415 ऊपये नुकसानभरपाई वितरित झाली आहे.

वेंगुर्ले, कणकवली, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यांमध्येही नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू असून, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने निधी जमा केला जात आहे.

ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर मिळणार निधी

जिह्यात सध्या 2 हजार 708 लाभार्थ्यांची 5 कोटी 43 लाख 39 हजार 491.74 ऊपये रक्कम ई-केवायसी प्रलंबित असल्याने वितरित होणे बाकी आहे. याशिवाय काही लाभार्थ्यांच्या बँक खाते व आधारशी संबंधित बाबींची पूर्तता आवश्यक आहे.

लाभार्थ्यांनी तलाठी किंवा तहसील कार्यालयातून व्हीके क्रमांक प्राप्त करून जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची नुकसानभरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तालुकानिहाय नुकसान भरपाई

तालुकानिहाय मंजूर व वितरित निधी

देवगड-मंजूर : 20 कोटी 77 लाख 1 हजार 816, वितरित : 14 कोटी 21 लाख 54 हजार 26, कुडाळ-मंजूर : 12 कोटी 25 लाख 75 हजार 725, वितरित : 10 कोटी 92 लाख 70 हजार 275, मालवण-मंजूर : 10 कोटी 29 लाख 81 हजार 283, वितरित : 7 कोटी 50 लाख 14 हजार 548, सावंतवाडी-मंजूर : 9 कोटी 88 लाख 22 हजार 515, वितरित : 8 कोटी 28 लाख 54 हजार 415, वेंगुर्ले -मंजूर : 6 कोटी 87 लाख 63 हजार 835, वितरित : 4 कोटी 78 लाख 35 हजार 60, कणकवली-मंजूर : 6 कोटी 54 लाख 91 हजार 650, वितरित : 5 कोटी 82 लाख 33 हजार 718.  दोडामार्ग- मंजूर : 5 कोटी 67 लाख 60 हजार 700, वितरित : 4 कोटी 40 लाख 63 हजार 675, वैभववाडी-मंजूर : 3 कोटी 75 लाख 82 हजार 576, वितरित : 3 कोटी 29 लाख 20 हजार 226

जिह्याची एकत्रित स्थिती

मंजूर लाभार्थी : 34,933

मंजूर निधी : 76 कोटी 6 लाख 80 हजार

नुकसान भरपाई मिळालेले लाभार्थी : 26,612

वितरित निधी : 59 कोटी 23 लाख 45 हजार

ई-केवायसी प्रलंबित लाभार्थी : 2,708

प्रलंबित रक्कम : 5 कोटी 43 लाख 39 हजार

Advertisement
Tags :

.