For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला हॉकी संघाला 50 लाखांचे बक्षीस

06:04 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला हॉकी संघाला 50 लाखांचे बक्षीस
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पाचवे स्थान मिळविल्याबद्दल हॉकी इंडियाने या संघाला 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

या स्पर्धेतील अॅमस्टेलव्हेन येथे झालेल्या पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठीच्या सामन्यात सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने पाचव्या मानांकित जर्मनीचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. 1974 साली पहिल्यांदा महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा खेळविली गेली होती आणि त्यात भारताने चौथे स्थान मिळविले होते. नेदरलँड्सच्या स्पर्धेमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने केवळ एक सामना गमविला. तसेच या स्पर्धेत भारताने बलाढ्या चीन, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना बरोबरीत रोखले तर दक्षिण आफ्रिकेचा त्यांनी 6-1 अशा गोलफरकाने पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघाच्या या कामगिरीचे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी कौतुक करुन त्यांना 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.