For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी 43 कोटींचा निधी

02:02 PM Apr 12, 2025 IST | Radhika Patil
कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी 43 कोटींचा निधी
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यायोजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचा समावेश केला असुन यासाठी 43 कोटी रूपयांच्या निधींची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले. योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थाननकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड आदींचा समोवश आहे.

Advertisement

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.