For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात ११ महिन्यात १३०० कोटी जीएसटी

05:40 PM Mar 05, 2025 IST | Radhika Patil
जिल्ह्यात ११ महिन्यात १३०० कोटी जीएसटी
Advertisement

 सांगली : 

Advertisement

जिल्ह्यामध्ये गेल्या ११ महिन्यात तेराशे कोटीचा जीएसटी महसूल जमा झाल्याची माहिती केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडून देण्यात आली. फेब्रुवारी २०२५ पर्यंत महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत १५ टक्के पर्यंत दमदार वाढ झाली. सांगलीत ३१,८९५ करदाते असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहामाहीत जीएसटी महसूल वाढीचे सातत्य कायम असून फेब्रुवारी २०२५ पर्यंतचे संकलन १५ टक्के वृद्धी दर्शवित आहे. मागील पूर्ण वर्षातील १२४३ कोटी हा महसूल यावर्षी ११ महिन्यातच पार झाला आहे. मागील आर्थिक वर्ष एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये ११३५ कोटी जीएसटीचे कलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आता चालू वर्ष एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५चा महसूल १३०० कोटी झाला असून मागील वर्षपिक्षा या ११ महिन्यांत जीएसटी महसुलात १६५ कोटिंची म्हणजे १५ टक्केच्या जवळपास वाढ झालेली दिसते. देशाचा विचार करताना देशात सध्या १,४९,३४,३७९ करदाते आहेत. मागील आर्थिक वर्ष एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये जीएसटीचे कलेक्शन १८,३९,७६६ कोटी होते. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५चा महसूल हा २०,१२,७२० कोटी झाला. मागील वर्षपिक्षा या ११ महिन्यांत जीएसटी महसुलात ९.४ टक्के वाढ दिसते. महाराष्ट्रचा विचार करता राज्या त सध्या १७,९५,१९३ करदाते आहेत. मागील आर्थिक वर्ष एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये जीएसटीचा एकूण महसूल २,९५,४५७कोटी होता. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या महिन्याच्या ३,२८,३२१ कोटी महसुल भरणा झाला. मागील वर्षीच्या या कालावधी च्या तुलनेत ११.१२ टक्क्यापेक्षा जादा कर संकलन या महिन्यापर्यंत झाले. अर्थव्यवस्था मजबूतीचे मोठे योगदान यात आहे. यासह करचोरीविरोधी विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर नियमित कारवाई, बनावट नोंदणी धारक शोध मोहीम या गोष्टी जीएसटी संकलनात योगदान देत आहेत. सांगलीचा विचार करता जिल्ह्यातील ३१,८९५ करदाते यांच्या योगदानामुळे एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ कालावधी पर्यंतची महसूल वाढ १५ टक्के ही देशाच्या तसेच राज्याच्या वाढीच्या तुलनेत सातत्याने चांगलीच आहे. केंद्र व राज्य जीएसटी विभागाने लेखापरीक्षण तसेच कर चुकवे गिरी विरोधी कारवाया, कर निर्धारणा, विवरण पत्रे छाननी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर वाढवल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. 

Advertisement
Advertisement
Tags :

.