For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्य आयपीओंच्या माध्यमातून 1.10 लाख कोटी उभारले

06:06 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्य आयपीओंच्या माध्यमातून  1 10 लाख कोटी उभारले
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

भारताचा शेअरबाजार एका तात्पुरत्या आयपीओ चक्राच्या पलीकडे जाऊन अधिक सखोल आणि शाश्वत भांडवल निर्मितीकडे वाटचाल करत आहे. सप्टेंबर 2026 पर्यंत मुख्य आयपीओतून सुमारे 1.10 लाख कोटी उभारण्यात आले आहेत. तर आगामी काळात 3.86 लाख कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आयपीओतून एकंदर उभारली जाईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. या वर्षी आतापर्यंत 84 मेनबोर्ड आयपीओंच्या माध्यमातून 1.10 लाख कोटी उभारले गेले आहेत.

सुमारे 130 कंपन्यांचा अद्याप सेबीची मंजुरी मिळालेली नाही, तर आणखी 75 कंपन्यांनी त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले असून त्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 2016 ते 2026 या कालावधीत (आजपर्यंत) मेनबोर्ड आयपीओंमधून एकूण 8.36 लाख कोटी रुपये उभारण्यात आले असून, वार्षिक निधी उभारणी 2016 मधील 26,494 कोटी रुपयांवरून 2025 मध्ये 1.76 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. केवळ 2026 च्या सुरुवातीच्या काळातच 84 इश्यूद्वारे 1.10 लाख कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. मेनबोर्ड आयपीओंच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे.

Advertisement

एसएमई बाजारातील स्थिती

भारतातील एसएमई आयपीओ बाजारात पाहता 2025 मध्ये इशुंची संख्या 267 इतकी होती जी वार्षिक तत्वावर सर्वाधिक नोंदली होती. 2026 मध्ये पाहता आजपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास 156 इशु दाखल झालेत. यांनी 2016 ते 2026 या काळात एकंदर 39,849 कोटी रुपयांची उभारणी केली आहे.

Advertisement
Tags :

.