For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेल्दी टिप्स

06:00 AM Jul 07, 2021 IST | Tarun Bharat Portal
हेल्दी टिप्स
Advertisement
  • कोथिंबीर ही केवळ पदार्थांचा स्वादच वाढवते असे नाही तर त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करणारे घटक असतात. यामुळे हृदयाच्या आजारामध्ये आराम मिळू शकतो.  कोथिंबीर आणि धने यांमध्ये रक्तशर्करेचा स्तर कमी करण्याचाही गुण असतो.
  • त्वचेला येणारी खाज ही सामान्य समस्या आहे. तेलाची मालिश हा खाजेवरील परिणामकारक उपाय आहे. कारण यामुळे रुक्ष पडलेल्या त्वचेला स्निग्धता किंवा ओलावा मिळतो. काही वेळा त्वचेला सुगंधित पदार्थ, क्रीम, लोशन, शाम्पू, पादत्राणे अथवा कपडय़ांमधील रसायने यांची ऍलर्जी येते आणि खाज सुटते. यावर उपाय म्हणून थोडय़ाशा कापरामध्ये दोन मोठे चमचे खोबरेल तेल मिसळून ते मिश्रण खाज येत असलेल्या भागावर नियमितपणे लावल्याने आराम मिळतो. तेल हलकेसे गरम करुन कापरात मिसळावे. याखेरीज मुलतानी माती आणि कडुनिंबाच्या पानांचा लेपही यावर प्रभावी ठरतो.
  • आवळा या फळाचे आरोग्यासाठी अनेकविध लाभ आहेत. आवळा रक्तशुद्धी करतो. पचनशक्ती सुधारतो.रात्री झोपताना दररोज आवळ्याचे चूर्ण मध अथवा पाण्यासोबत घेतल्यास पोट साफ होते. तसेच डोळ्यांसंबंधित रोगांमध्ये लाभ मिळतो. सुका आवळा शुद्ध तुपामध्ये तळून वाटावा. या चूर्णाने माथ्यावर लेप करण्याने घोळणा फुटण्याच्या तक्रारीत लाभ होतो.
  • लोणच्या सेवनामुळे मेंदू तरतरीत राहतो. मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीचा त्रास असल्यास दररोज सूर्योदयापूर्वी चमचाभर लोण्यामध्ये चिमूटभर मिरीपावडर घालून खडीसाखरेबरोबर खावे. गरोदर महिलांनी रोज चमचाभर लोणी खाल्ल्यास गर्भ तेजस्वी व हुशार निपजतो.
  • गर्भवती महिलांना भरपूर दूध येण्यासाठी आहारात मेथीची भाजी समाविष्ट करावी. या भाजीमध्ये लसूण घालून केल्यास ती अधिक लाभदायक ठरेल.
Advertisement
Advertisement
Tags :

.