For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हजारो लोकांना गायब करणारा जादूगार

06:28 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
हजारो लोकांना गायब करणारा जादूगार
Advertisement

अनेक वर्षापर्यंत लागला नाही ठावठिकाणा

Advertisement

जादूचे जग नेहमीच रहस्य अन् अचंबित करणारे राहिले आहे. छोट्या मोठ्या ट्रिक्सपासून स्टेडियमभर प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या मोठ्या इल्यूजनपर्यंत जादूगार स्वत:ची कमाल दाखवत राहिले आहेत. परंतु 1970 च्या दशकात लास वेगासमध्ये जादूगार विक्टर वेन यांनी दाखविलेला करिश्मा आजही जादूप्रेमींदरम्यान  सर्वात चर्चित अन् रहस्यमय घटना मानण्यात येते.

1975 मध्ये लास वेगासच्या एका मोठ्या थिएटरमध्ये विक्टर वेनचा शो सुरू होता. शोवरून हजारो प्रेक्षक उत्साहित होऊन बसले होते. शोच्या क्लायमॅक्समध्ये जादूगाराने प्रेक्षकांना ‘डोळे बंद करा आणि हळूहळू 1-10 अंग मोजा’ अशी सूचना केली. लोक मजेने अंक मोजू लागले, परंतु ते ‘10’ अंकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पूर्ण हॉल रिकामी झाला होता. सीट्स रिकामी होत्या, काही प्रोग्राम आणि टोपी तेथे राहिल्या होत्या. जादूगार विक्टर वेनही स्टेजवरून गायब होता. सुरक्षारक्षकांनी त्वरित शोध सुरू केला, परंतु कुठलाच सुगावा लागला नाही.

Advertisement

ही घटना इतकी अजब होती की पोलीस अन् प्रसारमाध्यमेही अचंबित झ्घली. ही खरी जादू होती असे काही लोकांचे मानणे होते. तर जादूच्या जगतातील जादूगार याला उत्कृष्ट अन् व्यापक प्रमाणचे इल्यूजन मानतात. त्यावेळी लास वेगासचे थिएटर  हाय-टेक स्टेज मॅकेनिज्म, मिरर्स, लायटिंग ट्रिक्स आणि अंडरग्राउंड पॅसेजसाठी प्रसिद्ध होते. नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या हॉल किंवा ठिकाणी शिफ्ट करण्यात आले होती किंवा मोठा ट्रॅपडोअर आणि हिडन एक्झिटचा वापर करण्यात आला होता, अशी थेअरी समारे आली. मनोवैज्ञानिक ट्रिकसोबत मास हिप्नॉसिसही ठरवत होते. परंतु खऱ्या रहस्याची उकल आजवर झाली नाही.

विक्टर वेन कोण होते?

विक्टर वेन 1970 च्या दशकातील प्रसिद्ध जादूगार होते. ते मोठमोठ्या स्टंट्ससाठी ओळखले जायचे. या घटनेनंतर ते अचानक गायब झाले. तर काही जणांनुसार ते वेगळ्या नावाने छोटे शो करत राहिले होते. परंतु कधीच या घटनेचा उल्लेख केला नाही. त्यांची खरी ओळख आणि नंतरचे जीवनही रहस्य ठरले आहे. ही कहाणी आता सोशल मीडिया, युट्यूब आणि जादू फोरमवर व्हायरल होत असते. अनेक लोक याला सत्य मानतात तर काही लोक याला शहरी वदंता ठरवितात. डेव्हिड कॉपरफील्ड यासारख्या नंतरच्या जादूगारांनीही प्रेक्षकांना गायब करण्याचे स्टंटे केले, परंतु पूर्ण ऑडियन्सला एकाचवेळी गायब करणे आताही बेजोड मानले जाते.

Advertisement
Tags :

.