For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

“स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसल्यास थेट कारवाई; ५ ऑक्टोबरपर्यंत परिवहन विभागाची विशेष मोहीम”;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

03:51 PM Sep 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
“स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसल्यास थेट कारवाई  ५ ऑक्टोबरपर्यंत परिवहन विभागाची विशेष मोहीम” परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Advertisement

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षांविरोधात परिवहन विभागाने कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा रिक्षा रस्त्यावर धावताना कोणत्याही परिस्थितीत दिसता कामा नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

स्क्रॅप झालेल्या तसेच नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी विशेष बैठक घेतली. यावेळी त्यांनी मोटार वाहन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून स्क्रॅप रिक्षांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राथमिकता

प्रवाशांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मंत्री सरनाईक यांनी बैठकीत स्पष्ट केले. स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणे धोकादायक असून, अशा वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षांची तपासणी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा वाहनांना रस्त्यावरून हटविण्यासाठी विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेशही देण्यात आले.

नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा

स्क्रॅप झालेल्या रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मंत्र्यांनी दिले. वाहनांची तपासणी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई आणि धोकादायक रिक्षांना प्रवासी वाहतुकीपासून दूर ठेवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, नियमबाह्य आणि धोकादायक वाहनांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.