For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सोरडी जि. प. शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळले , एक विद्यार्थी किरकोळ जखमी

10:01 PM Mar 12, 2022 IST | Abhijeet Khandekar
सोरडी जि  प  शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळले   एक विद्यार्थी किरकोळ जखमी

निकृष्ट बांधकामाचा परिणाम

जत, प्रतिनिधी

Advertisement

जत तालुक्यातील सोरडी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गखोलीचे छताचे प्लास्टर कोसळल्याने एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. बेंचचे नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून प्लास्टर बेंचचे पुढील बाजूस पडल्याने विद्यार्थ्यांना मोठी इजा झाली नाही. हा प्रकार निकृष्ट बांधकामामुळे घडला आहे. तिच्या पद्धतीने केलेल्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने संबंधित ठेकेदार , शाखा अभियंता व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.
किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आराध्य आरुण आभ्यागे (वय.७)असे आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सोरडी येथे जिल्हा परिषदेचे एक ते सात वर्ग आहेत. या वर्गाकरिता वर्गखोल्या आहेत ्यवस्थित असणार्‍या वर्गखोलीत इयत्ता पहिलीचा वर्ग भरत होता दरम्यान शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्लॅबचा सीलिंगचा भाग कोसळला. हा भाग बेंचच्या पुढील बाजूवर पडला बाजूवर पडला.यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. प्रसंगावधान राखून शिक्षकाने विद्यार्थ्यांना तात्काळ व्हरांड्यात शाळा भरवली आहे.
सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत २००६-०७ साली सर च्या शाळेचे बांधकाम झाले असून यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक लक्ष्मण भगवंत शेळके यांची जबाबदारी व्यवस्थित काम करून घ्यायची होती. त्यावेळी केलेला हलगर्जीपणा मुळे आज ही घटना घडली आहे. केवळ आज दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी बचवले आहेत. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालक व शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.