For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सलग चौथ्या दिवशीही शेअरबाजारात तेजी

12:58 AM Feb 07, 2020 IST | Tarun Bharat Portal
सलग चौथ्या दिवशीही शेअरबाजारात तेजी

वृत्तसंस्था / मुंबई :

Advertisement

अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर व्यापारी आठवडय़ामध्ये भारतीय शेअरबाजारातील तेजी कायम राहिली आहे. आठवडय़ाच्या चौथ्या व्यापारी दिवशी गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 163.37 अंकांनी वाढत 41,306.03 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 48.8 अंकांनी (0.40 टक्के) वधारत 12,137.95 अंकांवर बंद झाला. जगातील इतर बाजारामध्ये चीनचा शंघाई, हाँगकाँग, जपानचा टोक्यो आणि दक्षिण कोरियाचा सोल 2.88 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला.

सेन्सेक्समधील इन्डसइन्ड बँकेचे समभाग सर्वाधिक तेजी होते. यात 4 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी होती. याशिवाय एसबीआय, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, सन फार्मा, एचडीएफसी आणि पॉवर ग्रीड यांचे समभाग तेजीत होते. तर टायटन, इन्फोसिस, आयटीसी, कोटक बँक आणि एशियन पेन्ट्समध्ये घसरण नोंदविण्यात आली.

Advertisement

धोरणात्मक दरातील बदल न केल्यानंतरही आरबीआयच्या नरमतेमुळे गुंतवणूकदारांची मनस्थिती मजबूत झाली आहे, असे विशेषतज्ञांकडून सांगण्यात आले आहे. आरबीआयने रेपो दरात कपात केली नाही आणि हा दर 5.15 टक्क्यांवर स्थिर आहे. हा दर सलग दुसऱया पतसमीक्षा बैठकीत आरबीआयने स्थिर ठेवला आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. तर 2019 च्या सुरुवातीला पतसमीक्षा बैठकीत सलग पाच वेळा रेपो दरात कपात केली होती.

Advertisement

शेअरबाजारात बुधवारी सलग तिसऱया दिवशी तेजी होती आणि सेन्सेक्स 353 अंकांच्या तेजीसह 41,142.66 अंकांवर पोहोचला होता. कोरोना विषाणूवरील उचारातील यशस्वीतेच्या माहितीमुळेही जागतिक गुंतवणूकदार उत्साहात आहेत. याशिवाय एका अहवालात भारताच्या सेवा क्षेत्रातील कामांमध्ये सुधारणा आणि याचा जानेवारीमधील सात वर्षातील पोहोचले उच्च स्तर बाजाराला कारणीभूत ठरत आहे.

Advertisement
Tags :
×

.