For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सर्वात मोठा ‘वाहन मेळा’ आजपासून सुरू

10:22 PM Feb 04, 2020 IST | Tarun Bharat Portal
सर्वात मोठा ‘वाहन मेळा’ आजपासून सुरू

जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्हीचे होणार सादरीकरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

15 वा वाहन मेळा (ऑटो एक्स्पो) आजपासून ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश आणि प्रगती मैदान नवी दिल्ली या ठिकाणी सुरु होत आहे. या मेळय़ात 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी दिग्गज व्यावसायीक आणि माध्यमाचा प्रवेश होणार आहे. तर 7 ते 12 फेब्रुवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी हा मेळा खुला राहणार आहे. दुसरीकडे या मेळय़ावर मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे  आयोजकांनी यावेळी मेळय़ाचा नियोजित जागेत घट करुन ती जागा 40 हजार स्वेअर मीटर ठेवण्यात आला आहे. जो 2018 मध्ये 41 हजार स्वेअर फूट ठेवण्यात आला होता. हा प्रदर्शनाचा आकार मागील 20 वर्षांनंतर सर्वात कमी  राहणार आहे. 

Advertisement

यावेळी वाहन मेळय़ाची अनेक मोठय़ा कार निर्मिती कंपन्या हजेरी लावणार आहेत. यामध्ये टोयोटा आणि होंडासारख्या कंपन्यांचा समावेश असणार आहे. वाहन मेळय़ात तब्बल 70 नवीन गाडय़ा सादर होणार आहेत. ग्रेट वॉल मोटर्स आणि जगातील सर्वात स्वस्त एसयूव्ही कार सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचा मोठा जलवा राहणार आहे. वाहन मेळय़ात एकूण 112 प्रदर्शनकारचा समावेश आहे. तर सोबत नवीन 4 नवीन कार ब्रँडचा समावेश होणार आहे. 

Advertisement

2020 स्टार्टअप लाइन

ओकिनावा ऑटो टेक

जेडएन मोबिलिटी

कबीरा मोबिलिटी

चर्चित ई-मोबिलिटी        

सेहगल एलमोटो

ओएनबी टेक्नालॉजी इंडिया

ओमजे ईवी

एम2 गो इलेक्ट्रिक व्हेहीकल

इवर्व मोटर्स

सहभागी न होणाऱया कार कंपन्या

होंडा कार्स इंडिया

टोयोटा किर्लोस्कर मोटर

बीएमडब्लू इंडिया           

हीरो मोटोकॉर्प   

होंडा मोटारसायकल ऍण्ड स्कुटर इंडिया      

टीव्हीएस मोटर कंपनी

अशोक लेलँड

Advertisement
Tags :
×

.