For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संत कवी-आधुनिक कवींच्या निवडक काव्यांचे सादरीकरण

06:22 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
संत कवी आधुनिक कवींच्या निवडक काव्यांचे सादरीकरण
Advertisement

वसंत व्याख्यानमालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

वसंत व्याख्यानमालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दर महिन्यात एक साहित्यपर कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. या अंतर्गत ‘मराठी काव्यातील तत्वतरंग’ हा कार्यक्रम नुकताच वरेरकर नाट्या संघ येथे झाला.

Advertisement

यामध्ये संत कवींपासून आजच्या आधुनिक कवींपर्यंत निवडक काव्यांचे सादरीकरण करण्यात सुनीता देशपांडे, नम्रता कुलकर्णी, उषा रानडे, नमिता कुरुंदवाड, निधी केळकर यांचा सहभाग होता. त्यांनी गणेशस्तुती, तुकाराम महाराज, संत गोरापुंभार, रामदास, बहिणाबाई, केशवसुत, भा. रा. तांबे, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, ग. दि. माडगुळकर, मंगेश पाडगावकर, बा. भ. बोरकर, शांता शेळके, सुरेश भट, संदीप खरे, संकर्षण कऱ्हाडे, समीर सामंत यांच्या तत्वज्ञान अधोरेखित करणाऱ्या अभंगांचे व कवितांचे गायन केले.

या कार्यक्रमाचे निवेदन निर्मला कळ्ळीमनी व आशा कुलकर्णी यांनी केले. संकल्पना सुनीता देशपांडे यांची होती. कार्यक्रमाला प्रा. माधुरी शानभाग यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुण्या म्हणून भारती सावंत उपस्थित होत्या.

Advertisement
Tags :

.