For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

संवाद हाच उपाय!

06:00 AM Oct 02, 2021 IST | Tarun Bharat Portal
संवाद हाच उपाय

किशोरवयीन मुलीला समजून घेण्यात अनेकदा आई कमी पडते. खरे तर किशोवयीन मुलगा आणि मुलगी दोघांचीही मानसिक स्थिती बरीचशी नाजूक अशी असते. त्यामुळे त्यांना समजून घेणे हे आईचेच नाही तर वडिलांचेही कर्तव्य असते.

Advertisement

  • खूपदा अगदी छोटय़ा गोष्टींवर मुले चिडतात, नको इतका वाद घालतात. मग आपलीही चिडचिड होते. तिच्याशी बोलूच नये असे वाटते. पण असे करणे योग्य नाही. उलट मुले न बोलता कुढत राहू नये यासाठी तिच्याशी सतत संवाद राखा. पण हा संवाद म्हणजे मुलांना कटकट वाटावी इतका नाही. पण त्यांनी तुमच्याशी मोकळेपणाने बोलावे इतके तुमच्या नात्यांत मोकळेपणा असायला हवा.
  • शिस्तीचा बडगा नको इतका त्यांच्यावर उगारू नका. मुलांनी काय घालावे, काय खावे, किती खावे, किती खेळावे, किती अभ्यास करावा, हे आता त्यांचे त्यांना ठरवण्याची मुभा द्यावी. अर्थात ही मुभा देताना त्यांच्याकडून काही वावगे घडत नाहीये ना याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे.
  • शिवाय त्यांना शिस्तीचे धडे देताना आपण किती शिस्त पाळतो याकडेही लक्ष द्यावे. सतत मुलांना काही ना काही शिकवत राहण्यापेक्षा त्यांना त्यांच्यावरील जबाबदारीची सूज्ञपणे जाणीव करून दिल्याने आपोआपच या मुलांच्या वागण्यात बोलण्यात फरक पडतो.
  • आपल्याला जे कष्ट करावे लागले ते आपल्या मुलांना करावे लागू नयेत असे सगळ्याच आईवडिलांना वाटत असते. पण म्हणून त्यांच्या हिश्शाचे कष्टही त्यांना न करू देण्यात शहाणपणा नसतो. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर टक्केटोणपे खावेच लागतात. बाहेरच्या जगात जाताना त्यांना पूर्ण तयारीनीशी पाठवा. भेदरलेले, आत्मविश्वास गमावलेले असे त्यांना बनवू नका. त्यासाठी विविध स्तरांवर त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या दूर करायला त्यांना मदत करणे हा एक प्रभावी उपाय आहे.
Advertisement
Tags :
×

.