विंडीजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज
भारताची वेगवान गोलंदाजीची समस्या, कोहलीचा जबरदस्त फॉर्म चर्चेत
वृत्तसंस्था, गुवाहाटी : फलंदाजीची ताकद ही नि:संशयपणे भारताची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे, परंतु आज बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजविऊद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरताना वेगवान गोलंदाजीची अद्याप स्थिर नसलेली जोडी ही चिंतेची बाब ठरू शकते.
प्रेक्षकांचे लक्ष पुन्हा एकदा विराट कोहलीवर असेल, ज्याने तिऊअनंतपूरममधील मालिकेच्या पहिल्या सामन्यात विक्रमी शतक झळकावून आपल्या जुन्या लयीची आठवण करून दिली. गुवाहाटीमध्ये कोहलीला काहीशा जुन्या आठवणींची जाणीवही होऊ शकते. तो पुन्हा एकदा बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर परतत आहे, जिथे त्याने जानेवारी, 2023 मध्ये श्रीलंकेविऊद्ध आपले 45 वे एकदिवसीय शतक झळकावले होते.
मागील सामन्यात कर्णधार शुभमन गिलनेही शतक ठोकले आणि भारताने 296 धावांचे लक्ष्य 42 षटकांच्या आत गाठले. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवनेही प्रभावी गोलंदाजी करत गोलंदाजी आक्रमणातील आपले महत्त्व अधोरेखित केले. मात्र जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीचा विभाग तितकासा प्रभावी वाटला नाही. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या तयारीचा भाग म्हणून नितीशकुमार रे•ाrला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी देण्यासाठी मोहम्मद सिराजला वगळण्यात आले होते. अनुभवी सिराजऐवजी अष्टपैलू खेळाडू रे•ाrकडून गोलंदाजीची सुऊवात करण्याचा भारताचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आणि हा प्रयोग अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही.
हार्दिक पांड्याला अद्याप तंदुऊस्तीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही आणि बुमराह आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेला आहे. त्यामुळे पुढील वनडे विश्वचषकापूर्वी भारताच्या पर्यायांचे मूल्यमापन करण्याची संधी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात होते. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांचा पूर्ण पाठिंबा असूनही आणि दीर्घकालीन अष्टपैलू खेळाडू तसेच सहावा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या रे•ाrने सातत्याने निराशा केली आहे. आता प्रश्न असा आहे की, भारत रे•ाrला गोलंदाज म्हणून ‘घडवणे’ सुरू ठेवणार की, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी अधिक भरवशाच्या सिराजला पुन्हा संघात घेणार. मात्र वेस्ट इंडिजचा कमकुवत संघ पाहता जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला भारताकडून पदार्पणाची संधी देणे ही एक चांगली चाल ठरू शकेल.
संघ अष्टपैलू खेळाडूंच्या शोधात असताना एका मोठ्या प्रयोगाचा भाग म्हणून नमन धीरला पदार्पणाची संधी देण्यात आली. धीरने पाच षटकांत 33 धावा दिल्या, परंतु ‘शेर-ए-पंजाब टी-20 लीग’मधील धडाकेबाज कामगिरीनंतरही त्याला आपली फलंदाजीची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली नाही. भारताचे गोलंदाजीचे समीकरण अजूनही नाजूक स्थितीत आहे. जर सिराज परतला, तर अष्टपैलू खेळाडूंपैकी एकाला आपली जागा सोडावी लागू शकते. जर नबीला पदार्पणाची संधी दिली, तर अतिरिक्त गोलंदाज खेळवणे आणि इतर बाबींचा समतोल राखणे भाग पडेल.
संघ-भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, के. एल. राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीशकुमार रे•ाr, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल, नमन धीर.
वेस्ट इंडिज : शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्य्रू, जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, विटेल लॉस, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेरफेन रदरफोर्ड, जेडेन सील्स.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार