For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:02 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

मेष

Advertisement

‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’ अशी साधारण तुमची मनस्थिती असेल. लोकांनी दिलेला कुठला सल्ला ऐकावा आणि कुठला सोडावा, याची योग्य जाणीव तुम्हाला होईल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना राबवाल आणि त्याचे कौतुक होऊ शकते. कोणत्याही दडपणाखाली न येता निर्णय घ्यावा, असा टॅरोचा संदेश आहे. या आठवड्यात वेळ पाळणे तुम्हाला जमणार नाही.

धार्मिक पुस्तकाचे दान द्यावे

Advertisement

वृषभ

तब्येत बिघडू शकते. या आठवड्यात खर्चावर आळा घालणे अत्यावश्यक ठरेल. आर्थिक नियोजन ढासळण्याची शक्मयता आहे. तुमच्या सल्ल्यामुळे लोकांचा फायदा होईल. या आठवड्यात एकटेपणा जाणवू शकतो. काही लोक दिलेला शब्द पाळणार नाहीत. त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराची मदत घ्यावी.

पांढरा हात ऊमाल जवळ ठेवावा

मिथुन

आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. तब्येतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी त्रास देऊ शकतात. जवळच्या नातलगाची भेट होईल. कागदोपत्री व्यवहारात चोख रहा. कामांचे कौतुक होईल. तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये तुमच्या विषयी असूया निर्माण होऊ शकते. सावध राहणे गरजेचे आहे. परिवारातील सदस्यांचे मन सांभाळण्यात वेळ वाया जाईल.

 बेलाचे पान जवळ ठेवावे

कर्क

हा आठवडा धावपळीचा असेल. कामांचा उरक वाढवावा लागेल. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल. या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव तुमच्या मनावर येऊ नये यासाठी प्रयत्न करा. शरीराच्या उजव्या बाजूला छोटी मोठी दुखापत संभवते. कष्टांच्या तुलनेत आर्थिक आवक कमी असेल.

गंगाजलाने स्नान करावे

सिंह

जिभेवर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. बोलण्यात आणि खाण्या-पिण्यामध्ये जर चूक झाली तर महागात पडू शकते. तुमच्या वडिलोपार्जित संपत्ती विषयी जर वाद असतील तर सामोपचाराने मिटविण्याकडे कल ठेवा. कौटुंबिक समाधान चांगले प्राप्त होईल, पण लहान मोठ्या कारणाने थोडीफार चिडचिड होऊ शकते. पैशांच्या बाबतीत सावध रहा.

धार्मिक स्थळी मुळा ठेवून यावा

कन्या

वादावादीमुळे मनस्ताप होऊ शकतो. या आठवड्यामध्ये पैशांच्या देण्या - घेण्यावरून काही लोकांशी वाद होऊ शकतात. आपल्या मनातील गुपित अगदी जवळच्या माणसाकडे सुद्धा बोलून दाखवू नका. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसाधारण असेल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तुमच्या बाबतीत आदर निर्माण होईल.

तुळशीला दुध मिश्रित पाणी घालावे

तूळ

फाजील धाडस कोणत्याही बाबतीमध्ये दाखवू नये. कामाच्या ठिकाणी अतिआत्मविश्वास नडू शकतो. काही गोष्टी तुमच्यापासून जाणून-बुजून लपवल्या जातील.  इतरांचे सगळे बोलणे मान्य करू नये. नवीन ओळखीतून आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकेल. संततीशी जपून वागावे.

आंब्याच्या झाडाजवळ हिरवा कपडा ठेवून द्यावा

वृश्चिक

तडजोड करावी लागेल. मनात योजलेल्या प्रत्येक कामाला यश मिळेलच असे नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरफटून न जाता भविष्याबद्दल विचार करणे जास्त सोयीस्कर ठरेल. पूर्वी मदत केली होती अशा व्यक्तीशी समझोता होऊन काही कामे मिळण्याची शक्मयता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

काजळाची डबी जवळ ठेवावी

धनू

कामांचे नियोजन नीट केल्यास फायदा होऊ शकतो. हा येणारा आठवडा धावपळीचा असणार आहे. घरातील कामे आणि बाहेरची कामे यांचे संतुलन राखताना तब्येतीवर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. गरज असेल तेव्हा न चुकता दुसऱ्याचा सल्ला घ्यावा यातून फायदा होण्याचे संकेत आहेत.  लोक तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतात.

हीना अत्तर वापरावे

मकर 

कामाधंद्याच्या ठिकाणी नवीन धोरण वापरल्यामुळे नवीन कामे मिळतील आणि त्यात यशही मिळेल. घरातील आणि बाहेरच्या व्यक्तींशी वागताना त्यांना जास्त महत्त्व देऊन वागा; ज्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. कौटुंबिक समाधान प्राप्त करण्याकरता काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. आर्थिक आवक चांगली असेल.

केळीच्या झाडाखालील मातीचा टिळा लावावा

कुंभ

तब्येतीच्या चढ-उतारामुळे त्रस्त व्हाल. एखादा अनपेक्षित आजार त्रास देऊ शकतो. परिवारातील सदस्यांना पुढे आपले म्हणणे मांडण्यात मध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडू शकता. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल. प्रेमीजणांनी अनावश्यक बाबतींमध्ये मत व्यक्त करू नये. लोकांचे तुमच्याबद्दल असलेले गैरसमज वाढू शकतात.

जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करा

मीन

प्रवास घडेल. हा आठवडा  थोडा फार मानसिक चिंतेचा असू शकतो. परिवारातील व्यक्तींमध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे, असे तुम्हाला वाटेल आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न कराल. घर खर्चात वाढ झाल्याने ताळमेळ बसणार नाही. अनावश्यक खर्च टाळावा. प्रेमीजणांनी दूर वर जाणे टाळावे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल.

सफेद हकीक जवळ ठेवावा

टॅरो उपाय : झोपेत तुम्हाला वाईट स्वप्ने पडत असतील, मेलेली माणसे दिसणे, साप दिसणे, विभत्स दृश्य दिसणे असे होत असेल तर हळदीची गाठ बांधून उशीजवळ ठेवा आणि झोपी जा. असे केल्याने तुम्हाला कधीही भयानक स्वप्न पडणार नाही.

Advertisement
Tags :

.