राज्यभर पावसाचा धुमाकूळ
नदी, नाले, ओढ्यांना पूर, जनजीवन विस्कळीत : राज्याच्या पाणीसाठ्यात वाढ : सखोल भागात पाणी साठले : घाट क्षेत्राला झोडपले
त. भा. प्रतिनिधी
पुणे
राज्यभर पावसाचा धुमाकूळ सुऊच असून, रविवारी सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नदी, नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. काही धरणांतून विसर्ग सुऊ असल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. यामुळे सखोल भागात पाणी साठल्याने शहरी तसेच ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर अनेक घाट भागात अतीवृष्टी झाल्याने धबधबे ओसंडून वाहत आहेत. यामुळे राज्याच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून, हा साठा आता 26.42 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यात विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून, खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. कोकण, गोवा किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्यात 1 जुलैपासून मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीददरम्यान असलेला हवेचा दाब यामुळे बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रावऊन मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने वाहत आहेत. परिणामी शुक्रवार, शनिवारनंतर रविवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी राज्याला मोसमी पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी या पावसाची तीव्रता अधिक होती. त्यातही कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर,पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागात काही ठिकाणी अतिवृष्टी नोंदविण्यात आली. कोकणातील सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत, तर मुंबईतही मुसळधार पाऊस झाल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गही यामुळे ठप्प झाला. कोल्हापूर, सांगलीत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात कृष्णा नदी दुथडी भऊन वाहत आहे. या भागातील बंधाऱ्यावऊन पाणी ओसंडून वाहत आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सखल भागात पाणी साठल्याने वाहतूक धीम्या गतीने सुऊ होती. पावसाच्या माऱ्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. नाशिक, जळगाव भागातही पावसाची तीव्रता अधिक होती. गोदावरी नदी पात्र भऊन वाहत आहे.
रायगड जिह्यालाही मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर रायगडच्या उत्तर भागात पुर सुदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे पेण, नागोठणे, पाली, रोहा परिसरात देखील पुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाण्याच्या चिखली तालुक्मयातील मिसाळवाडी परिसरात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. ओढा आणि नदीला आलेल्या पुरामुळे मुख्य पुलावरून पाणी वाहत आहे. गोसीखुर्द, हतनूर धरणातून विसर्ग सुऊ असल्याने वैनगंगा, तापी नदीची पाणीपातळी वाढली आहे.
घाट भागाला झोडपले
राज्यातील घाट क्षेत्रात गेल्या 24 तासांत पावसाने झोडपून काढले आहे. यात काही भागात अतीवृष्टी देखील झाली आहे. महाबळेश्वर, माथेरान सारख्या थंड हवेच्या ठिकाणी दिवसभर पावसाचा मारा सुऊ असून, धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी 100 मिमी पेक्षा अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस पावसाचा जोर
राज्यात पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता कायम राहणार आहे. त्यातही कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान खात्याने सोमवारी रेड अलर्ट दिला आहे. मंगळवारनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, सोमवारी रायगड जिह्यांसाठी, नाशिक-पुणे-सातारा घाट भागासाठी हवामान विभागाने ’रेड अलर्ट’ म्हणजेच लाल इशारा जारी केला आहे. याच काळात मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पुणे या जिह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिह्यांमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळणार असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांत ’येलो अलर्ट देण्यात आला असून, येथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्मयता आहे.
मंगळवार, 7 जुलै रोजी पावसाची स्थिती काहीशी बदलणार असली तरी रायगड जिह्यासाठीचा रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. इतर कोकणपट्टा तसेच मध्य महाराष्ट्रात मध्यम ते तीव्र स्वऊपाचा पाऊस अपेक्षित आहे.
बुधवार, 8 जुलैपासून मात्र राज्याला पावसाच्या या तडाख्यातून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. या दिवशी पावसाची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्मयता असून, राज्यातील एकाही जिह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. केवळ मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिह्यांमध्ये तसेच विदर्भातील गोंदियामध्ये ‘येलो अलर्ट’ असेल.