For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

येमेनच्या राष्ट्रपती भवनावर हुथींनी पुन्हा डागली क्षेपणास्त्र

06:21 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
येमेनच्या राष्ट्रपती भवनावर हुथींनी पुन्हा डागली क्षेपणास्त्र
Advertisement

वृत्तसंस्था/ सना

Advertisement

येमेनच्या हुथी बंडखोरांनी शुक्रवारी रात्री एडनमधील राष्ट्रपती भवनावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs डागली. तथापि, क्षेपणास्त्रांनी आपले लक्ष्य भेदले की नाही हे अस्पष्ट आहे. या हल्ल्यानंतर रुग्णवाहिका राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जाताना दिसल्या. हुथी बंडखोरांनी एडन विमानतळावरही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे येमेन सरकारच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले. तथापि, त्यांनी जीवितहानी किंवा जखमींविषयी कोणतीही माहिती दिली नाही. 15 दिवसांतील राष्ट्रपती भवनावरील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले होते. याव्यतिरिक्त हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या मदिना प्रदेशाच्या दिशेने एक ड्रोनही डागला होता. हा हल्ला सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने हवेतच परतवून लावला होता.

सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने मक्कामध्येही एक ड्रोन नष्ट केल्याचा दावा केला आहे. येमेनचे सरकार सौदी अरेबियाच्या पाठिंब्याने लढत आहे. येमेनमध्ये हुथी बंडखोर आणि सरकार यांच्यात दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. सौदी अरेबिया येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारला पाठिंबा देतो आणि हुथींविरुद्ध लढणाऱ्या सरकारी सैन्याला हवाई मदत पुरवतो. इराणवर हुथींना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. राष्ट्रपती भवनाच्या संकुलावरील हल्ल्यामुळे येमेनमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यांनी सौदी लष्करी मोहिमेशी संबंधित लक्ष्यांना लक्ष्य केल्याचे हुथींनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

.