मोनिक्युअर करताना
06:00 AM Oct 28, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
आपला चेहरा नितळ दिसावा यासाठी आपण नेहमी आग्रही असतो. मात्र आपण हातापायाच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गोरा चेहरा आणि काळवंडलेले हातपाय, अशी विसंगती दिसते. परंतु घरच्या घरी पायांची काळजी घेऊ शकता. योग्य सेवा मिळावी म्हणून बहुतेक महिला
पार्लरमध्ये जातात. परंतु घरीदेखील आपण मॅनिक्युअरच्या साहाय्याने हातापायांची काळजी घेऊ शकतो.
Advertisement
- बर्याचदा आपल्या चेहर्याची त्वचा आणि हाताची त्वचा मॅच होत नाही. अशावेळी आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी बाहेरजाताना सनकोट किंवा सनस्क्रिन लोशन वापरावे. तसेच महिन्यातून किमान एकदा तरी मॅनिक्युअर करावे. त्यामुळे आपल्या हाताची त्वचा सुंदर आणि मुलायम दिसते. मसाज खालून वरच्या दिशेने करावा.
- बोटांच्या साहाय्याने वरच्या बाजुला एका मागे एक हात गोलाकार फिरवावा.
- मॅनिक्युअर : मॅनिक्युअर म्हणजे हातांची स्वच्छता करणे. हातांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
- तळ हाताला चिरा पडणे, त्वचा खरखरीत होणे. तसेच हातावर काळे डाग पडणे, त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरीता मॅनिक्युअर करणे गरजेचे असते.
- मॅनिक्युअरमधील सगळय़ात महत्वाचा टप्पा म्हणजे नखांचे सौंदर्य वाढवणे. जसे नखांची स्वच्छता करणे व नखांना आकार देणे मॅनिक्युअरसाठी लागणारी साहित्य बाजारात सहज उपलब्ध होतात. मॅनिक्युअरसाठी टॉवेल, नेल रिमुव्हर, साबण, ब्रश, नेल पॉलिश, शॅम्पू, गरम पाणी, क्युटिकल रिम्युअर, कापूस, हँडक्रीम आदी साहित्य लागते.
- मॅनिक्युअर करताना प्रथम कापूस व नेल रिमुअरच्या साहाय्याने आधीची नेल पॉलिश काढून टाकावी. काडीने किंवा स्ट्रिकने नखांच्या कोपर्यातील कलर नीट काढून नखांना आकार द्यावा.
- मग काडीच्या कापसाचे आवरण करुन नखांच्या अवतीभवती असलेली जाड स्किनला लावावे. ज्यामुळे ती जाड स्किन मुलायम होते. स्किन काढून टाकावे. यामुळे नखांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
- आता गरम पाण्यात शॅम्पू व हायड्रोजन पॅरॉक्साईड टाकून थोडा वेळ दोन ते तीन मिनिटे हात पाण्यात बुडवून ठेवावेत. नंतर ते ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करावे. एक एक करुन दोन्ही हात स्वच्छ करावे. हँडक्रीमने मसाज करावा.
Advertisement