मॉर्केल, मोहित सीएसकेच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी 2027 च्या हंगामापूर्वी आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. या बदलांनुसार, आयपीएलमधील या प्रतिष्ठित फ्रँचायझीसाठी दीर्घकाळ खेळलेले अल्बी मॉर्केल आणि मोहित शर्मा आता सपोर्ट स्टाफचा भाग बनले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्बी मॉर्केल सीएसकेमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सामील झाला आहे, तर मोहित शर्माची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोहित याआधी अनेक हंगाम या संघाकडून खेळला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू गॅरेथ बॅटी यांचीही सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स फॉस्टर आणि सहाय्यक प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम हे सीएसकेसोबतचे आपले काम सुरू ठेवतील.
आयपीएलमध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सीएसकेने सोशल मीडियाद्वारे या नियुक्त्यांची घोषणा केली. सपोर्ट स्टाफचे नेतृत्व मुख्य प्रशिक्षक झहीर खान करतील, ज्यांनी स्टीफन फ्लेमिंगची जागा घेतली आहे. फ्लेमिंग 2009 ते 2026 पर्यंत सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक होते. सीएसकेने एरिक सायमंड्स, राजीव कुमार, टॉमी सिमसेक आणि मायकेल हसी यांसारख्या मावळत्या सपोर्ट स्टाफ सदस्यांचेही आभार मानले आहेत.
