For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेटाचा वैयक्तिक एआय एजंट लाँच

06:21 AM Sep 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेटाचा वैयक्तिक एआय एजंट लाँच
Advertisement

ई-मेल पाठवण्यासह पेमेंटही करणार, सुरक्षेसह अन्य फिचर्सचाही सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

मेटाने नुकतेच 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी ‘म्यूज’ नावाचा एक वैयक्तिक कृत्रिम बुद्धिमत्ता एजंट लॉन्च केला. तो वेळापत्रक बनवणे आणि खरेदी करणे यांसारख्या दैनंदिन कामांमध्येही मदत करणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

मेटाच्या मते, म्यूज दीर्घकालीन ध्येयांना कृती योजनांमध्ये बदलण्यासही मदत करू शकतो. तो सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. त्याची सुरक्षा-गोपनीयता वैशिष्ट्यो खास आहेत. हा एजंट एका सुरक्षित व्हर्च्युअल मशीनवर चालतो, ज्यामध्ये एजंट आणि वापरकर्ता दोघांचाही डेटा सुरक्षित राहतो. वापरकर्ते एका वेगळ्या अॅपवर व्हॉट्सअॅपद्वारे म्यूजशी चॅट करू शकतात. तो ईमेल पाठवणे आणि सहली बुक करणे यांसारखी छोटी कामे करू शकतो.  तसेच, तो वर्षभराच्या व्यायामाची योजना तयार करणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे यांसारख्या दीर्घकालीन ध्येयांवर काम करू शकतो.

एआय चॅटबॉट-एआय एजंटमध्ये काय फरक?

एआय चॅटबॉट वापरकर्त्याच्या प्रश्नांना आणि सूचनांना प्रतिसाद देतो. उदाहरणार्थ, तुम्ही विचारता, ‘दिल्ली ते न्यूयॉर्कसाठी सर्वात स्वस्त विमान कोणते आहे?’ चॅटबॉट तुम्हाला विमानाचे पर्याय आणि किंमती सांगेल. यानंतर, विमान निवडले जाईल आणि बुक केले जाईल. एआय एजंट केवळ माहितीच देत नाही, तर वापरकर्त्याच्या वतीने काम देखील करू शकतो.

म्यूजसोबत कामाची परवानगी व ते सुरक्षित आहे का?

म्यूजला ईमेल, कॅलेंडर, शॉपिंग यांसारख्या सेवांशी जोडले जाऊ शकते. कोणत्या अॅपला किती सक्सेस द्यायचा हे वापरकर्ता स्वत: ठरवतो. यासाठी मेटाने म्यूज सिक्युअर व्हीएम तयार केले आहे. व्हीएम म्हणजे व्हर्च्युअल मशीन, जी क्लाउडवर चालणारी एक स्वतंत्र संगणक प्रणाली आहे. ती वापरकर्त्याचा डेटा आणि जोडलेल्या सेवांची क्रेडेन्शियल्स सुरक्षित ठेवते.

म्यूज पासवर्ड, कार्डची माहिती दाखवते का?

मेटाच्या मते, नाही. वापरकर्त्याचा पासवर्ड आणि पेमेंट तपशील सुरक्षित स्टोरेजमध्ये ठेवला जातो. म्यूज त्यांचा वापर करू शकते, परंतु ती ही माहिती दाखवत नाही. वापरकर्ता म्यूजने केलेल्या कामांचा आणि पुढे करायच्या कृतींचा ऑडिट ट्रेल देखील पाहू शकतो.

मार्क झुकरबर्गच्या एआय व्हिजनमधील वाटा

मेटाचा एआय एजंट म्यूज हा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या प्रत्येकापर्यंत एआय सुपरइंटेलिजन्स पोहोचवण्याच्या व्हिजनचा एक भाग आहे. गेल्या महिन्यात ऑनलाइन प्रकाशित झालेल्या सुमारे 6,500 शब्दांच्या एका निबंधात त्यांनी आपली दूरदृष्टी मांडली.

Advertisement
Tags :

.