मॅक्लारेनचा नॉरिस हंगेरी शर्यतीत विजेता
रेड बुलच्या व्हर्स्टापेनला दुसरे, मर्सिडीजच्या अँटोनलीला तिसरे स्थान
वृत्तसंस्था, मोग्योरोड, हंगेरी
येथे झालेल्या हंगेरियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत जबरदस्त वेग व नशिबाची थोडी साथ मिळाल्याने मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने जेतेपद मिळवित आठ महिन्यांची प्रतीक्षा संपवली. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे तर मर्सिडीजच्या किमी अँटोनेलीने तिसरे स्थान मिळविले.
अँटोनेलीला तीन स्थानांची ग्रिड पेनल्टी मिळूनही त्याने सातव्या स्थानावरून नवव्यांदा पोडियमवर स्थान मिळवित आपली ताकद दाखवून दिली. त्याने फेरारीच्या लुईस हॅमिल्टनवर 50 गुणांची आघाडी घेतली आहे. हॅमिल्टनने पिटमध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने त्याला दंड करण्यात आला. त्यामुळे त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने सातवे स्थान मिळविले. फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने चौथे, रेड बुलच्या आयझॅक हॅडजरने सहावे, रेसिंग बुलच्या लियाम लॉसनने आठवे तर ऑडीच्या निको हल्केनबर्गने नववे तर रेसिंग बुल्सच्या आर्विड लिंडब्लाडने दहावे स्थान मिळविले. आता ब्रेकनंतर पुढील शर्यत डच ग्रां प्रि 23 ऑगस्ट रोजी नेदरलँड्समध्ये होईल.