For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलांचं मोबाइल वेड कमी कस करायचं

06:00 AM Oct 16, 2021 IST | Tarun Bharat Portal
मुलांचं मोबाइल वेड कमी कस करायचं
Advertisement

हल्ली संगोपनादरम्यान सर्वच पालकांना एका समस्येला हमखास सामोरं जावं लागत आहे. ते म्हणजे मुलांचं मोबाईलवेड. अर्थात मुलंच काय, मोठय़ांनाही या आधुनिक गॅजेटच्या वेडानं झपाटलं आहे. काही जणांना त्याची इतकी चटक लागलीय की जेवतानाही अनेक जण त्याच्याशिवाय बसतच नाहीत. पण मोठय़ा माणसांचं त्यानं फारसं काही बिघडेल असं नाही किंवा बिघडलं, तरी ते नियंत्रणात आणण्याची त्यांची क्षमता असते. पण मुलांचं काय? त्यांच्यावर याचा विपरित परिणाम  होण्याची शक्यता आहे. मग त्यांना  यापासून कसं दूर करता येईल?

Advertisement

  • कारणे जाणून घ्या...
  • मोबाइल त्यांना का आवडतो, ते आधी जाणून घ्या. त्यांची कारणं समजून घ्या. त्यात किती तथ्य आहे, त्याचा अंदाज घ्या. त्याला त्याची समज आलीय का, याचीही पडताळणी करा.
  • बाहेरच्या खेळांची आवड निर्माण करा
  • मोबाइलबाबत मुलांनी कितीही समर्थन केलं, तरीही त्यांना त्याचा फोलपणा पटवून द्या. आरडाओरडा करून काहीही होत नाही. त्यांच्याशी प्रेमाने बोला आणि मोबाइलपेक्षाही बाहेरच्या खेळाची आवड त्यांच्यात निर्माण करा. त्यांना तुम्ही आग्रहाने बाहेर खेळायला पाठवा, त्यात गोडी निर्माण झाली की आपोआप मोबाइलपासून ती दूर जातील.
  • वेळापत्रक ठरवा
  • मोबाइलवर गेम खेळायलाही हरकत नाहीच, पण त्याआधी त्याचं एक वेळापत्रक ठरवा. त्याच वेळी त्यांनी मोबाइल हातात घ्यावा, नाहीतर मिळणार नाही. हे बजावून सांगा. त्या वेळी तुम्ही त्यांच्यासमोर राहाल, याची काळजी घ्या. म्हणजे त्यांच्यावर एक नैतिक दडपण येईल. महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या हातात मोबाइल देताना प्रथम त्यावरील इंटरनेट कनेक्शन, मोबाइल डाटा बंद करा.
  • घरातलेच पर्यायी खेळ सुचवा  
  • मुलांनी हातात मोबाइल घेतला की लगेच त्यांना घरातल्याच काही खेळांची आठवण करून द्या. ज्यात त्यांना विशेष आवड असेल, असे कॅरम, बुद्धिबळसारखे बैठे खेळही त्यांना शिकवा. त्यातली गंमत त्यांना अनुभवू द्या. एकदा का त्याची गोडी त्यांना लागली की मग ते फार काळ मोबाइलला चिकटून राहणार नाहीत. 
  • छंदांचीही गोडी लावा
  • चित्रकला, रंगकाम, ओरिगामी, झाडांची देखभाल... यासारख्या काही छंदांची गोडी त्यांना लावा. एकदा का मुलांना छंदांची गेडी लागली की मग ते मोबाइलच्या नादी फारशी लागणार नाहीत. त्यांना आवड लागलेल्या छंदांमध्ये कोणतेही असू द्यात, अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींतही ते आनंद शोधत असतात.  अशा वेळी त्यांना नावे ठेवण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या.
Advertisement
Tags :

.