‘मायक्रोसॉफ्ट’ तिमाहीत नफ्यामध्ये
वॉशिंग्टन :
टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट चालू आर्थिक वर्षात (2019-20) मधील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 11.6 अब्ज डॉलर (82890 कोटी रुपये) फायदा झाला आहे. हा मागील वर्षातील समान तिमाहीच्या तुलनेत 38टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तर महसूल कमाईत 14 टक्क्यांनी वाढून 36.9 अब्ज (2.63 लाख कोटी रुपये) राहिली आहे. प्रति समभागातून 40 टक्क्यांचा फायदा कंपनीला झाला आहे. वर्षाचा विचार केल्यास मायक्रोसॉफ्टचे आर्थिक वर्ष जुलै ते जून या कालावधीत गणले जाते.
कंपनीच्या सादर केलेल्या अहवालातून सर्वाधिक महसूल प्राप्त झाला आहे. हा आकडा विश्लेषकांनी नोंदवलेल्या अनुमानापेक्षाही सरस असल्याचे पहावयास मिळत आहे. सर्वात मोठय़ा महसूल सेगमेंट इंटेलीजेट क्लाउडमध्ये समावेश असणाऱया एज्योर डिव्हीजनची महसूल वाढ 62 टक्क्यांवर राहिली आहे. मागील वर्षात याच तिमाहीत ही वाढ 63 टक्क्यांवर राहिली होती. कंपनीने याच डिव्हीजनचा महसूल डॉलरमध्ये सांगितला नाही. क्लाउड सेर्व्हिसेसमध्ये एकूण महसूल 12.5 अब्ज डॉलर (89330 कोटी रुपये) राहिला आहे. हा मागील डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी अधिक राहिला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.