For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप भवन’ ठरणार दीपस्तंभ

06:55 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजप भवन’ ठरणार दीपस्तंभ
Advertisement

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे प्रतिपादन : अमित शहा यांच्याहस्ते होणार लोकार्पण

Advertisement

प्रतिनिधी / पणजी

भाजपचे अत्याधुनिक भवन म्हणजे राज्यातील हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांचा त्याग आणि परिश्रमाचे फळ आहे. पक्षाच्या पुढील राजकीय प्रवासात एका दीपस्तंभाप्रमाणे ते मार्गदर्शन करेल, असा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला आहे. कदंब पठारावर उभारण्यात आलेल्या भाजप भवनच्या भव्य वास्तूत गुऊवारी वास्तू शांतीसह अन्य धार्मिक विधी पार पाडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार मायकल लोबो, जीत आरोलकर, केदार नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार प्रवीण झांट्यो, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर,  यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या यजमानपदाखाली धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि नाईक यांच्याहस्ते भवनवर भाजपचा ध्वज फडकवण्यात आला. ‘भाजप भवन’ नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते या भवनचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.

काँग्रेसने आत्मपरीक्षण करून बोलावे : मुख्यमंत्री

त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, काँग्रेस पक्षाला स्वपक्ष सांभाळता आला नाही आणि देशही चालवता आला नाही. त्यामुळे भाजपवर टीका करण्यापूर्वी काँग्रेसने आधी आत्मपरीक्षण करावे. याउलट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वपरिश्रमातून आणि विविध पारदर्शक मार्गांनी निधी संकलित करून पक्षाच्या नवीन कार्यालयाची उभारणी केली आहे, असे प्रतिपादन केले.

पुढे बोलताना त्यांनी, आम्ही केवळ राजकारण करत नसून देश घडवण्याचे कार्य अविरतपणे करत आहोत असे सांगितले व काँग्रेसने भाजप भवनला ‘चंदा चोरी भवन’ म्हणून केलेल्या टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. श्री. पार्सेकर यांनी बोलताना, अनेक वर्षांनंतर स्वत:च्या घरात आल्यासारखा आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी पार्सेकर यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण दिसून आले.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना, भाजप आणि मगोप युतीमधील दोन्ही पक्षांचे उमेदवार येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत निश्चित केले जातील, असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.