For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-अफगाण टी-20 लढत आज

06:42 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अफगाण टी 20 लढत आज
Advertisement

पावसाचा अडथळा येण्याची दाट शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था, निशिन (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धेत बलाढ्या भारतीय टी-20 क्रिकेट संघाची मोहिम आजपासून सुरू होत असून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला असल्याने भारताची लढत अफगाणविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर त्याचे थेट प्रक्षेपण होईल. याशिवाय ऑनलाईन स्ट्रीमिंग सोनी लाईव्हवर होणार आहे.

या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने कदाचित तो रद्द होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सरस मानांकन असल्याने भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळेल. भारताने मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळविले होते. सलग दुसरे सुवर्ण मिळविण्यास हा संघ सज्ज झाला आहे. मात्र येथील मैदानावर शुक्रवारी झालेले दोन्ही सामने (मलेशिया वि. ओमान व जपान वि. नेपाळ) पावसामुळे होऊ शकले नव्हते. भारतीय महिला संघाने क्रिकेटचे सुवर्णपदक मिळविले असल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे. आशियाई संघात वैभव सूर्यवंशीचाही समावेश असल्याने त्याला या सामन्यात खेळण्याची संधी दिली जाते का, हे पहावे लागेल.

Advertisement

भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, विप्राज निगम, रवी बिश्नोई, बुमराह, यश ठाकुर, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.

Advertisement
Tags :

.