For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या पॅरा टेटेपटूंना 16 पदके

06:40 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या पॅरा टेटेपटूंना 16 पदके
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

फिनलँडमध्ये नुकत्याच झालेल्या आयटीटीएफ विश्व पॅरा फ्युचर लेहाती टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पॅरा टेबलटेनिसपटूंनी दर्जेदार कामगिरी करताना एकूण 16 पदकांची कमाई केली. यामध्ये 6 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा समावेश आहे.

या स्पर्धेत विविध विभागातील एकेरीमध्ये भारताने 10 पदके मिळविली तर दुहेरीमध्ये भारतीय स्पर्धकांनी आणखी सहा पदकांची भर घातली. या सहा पदकांमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. पुरुषांच्या 4-8 विभागातील दुहेरीत भारताच्या रमेशभाई चौधरी आणि सुमित सेहगल यांनी सुवर्णपदक पटकाविताना दक्षिण आफ्रिकेच्या इब्राहीम अब्दुल्ला व रेकेन अब्दुलरेहमान यांचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेत सुमित सेहगलने मिश्र दुहेरीत दिपीकाराणी रामनाथन समवेत सुवर्णपदक पटकाविताना फिनलँडच्या केलाव्ही आणि टेपोला यांचा 3-0 असा पराभव केला. भारताच्या सोनल पटेल आणि रमेश भाई चौधरी यांनी मिश्र दुहेरीत रौप्यपदक मिळविले. शुभम वाधवा आणि जेडी मदन या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीत कांस्यपदक तसेच प्राची पांडे आणि सविता अजानकट्टी यांनी महिला दुहेरीत कांस्यपदक, शिवम पाल आणि नुराली जामनी यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.