For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

भारतात ‘वाहन मेळा-2020’चा शुभारंभ

08:54 PM Feb 05, 2020 IST | Tarun Bharat Portal
भारतात ‘वाहन मेळा 2020’चा शुभारंभ

7 फेबुवारीपासून सर्वसामान्यांसाठी प्रवेश मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा

जगातील सर्वात मोठा 15 व्या ‘वाहन मेळा-2020’चा शुभारंभ बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी भारतामधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी झाला आहे. दोन दिवस तज्ञ आणि माध्यमाच्या समोर सादरीकरण करण्यात आल्यानंतर तिसऱया दिवसांपासून सर्वसामन्यांसाठी हे मेळावा खुला होणार आहे.

Advertisement

पहिल्या दिवशी मारुती सुझुकीने मिशन ग्रीन मिलियन या संकल्पनेवर आधारीत पहिली इलेक्ट्रिक कार फ्यूचरो-ई ची झलक दाखवली आहे. तर सोबत टाटाकडून सिएरा ईवी कन्सेप्ट एसयूव्हीचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ रेनो, टाटा मोटर्स, किया, महिंद्रा, मर्सिडिज, हय़ुंदाई, फोक्सवॅगन आणि प्रथमच सहभाग घेणाऱया एमजी मोटर्सने आपले नवीन मॉडेल आणि ऍडव्हान्स टेक्नालॉजीचे सादरीकरण केले आहे. या कंपन्यांचा सर्वाधिक भर हा इलेक्ट्रिक वाहन आणि एसयूव्ही सेगमेंटवर राहणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. 

Advertisement

वाहन मेळय़ात कोरोनाची धास्ती कायम

कोरोना विषाणुचा वाढता प्रचार आणि प्रसार यामुळे मोठय़ा प्रमाणात चीनमध्ये वातावरण भीतीदायक झाले असून जगभरातील अनेक मुख्य शहरे पूर्णपणे बंदीस्त करण्यात आली आहेत. याचाच काहीसा प्रभाव वाहन मेळा 2020 वर पडला असून आयोजकांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स(सियाम) यांनी चिनमधील नवीन येणाऱया शिष्टमंडळाला वाहन मेळाव्यात सहभागी होण्यास थांबविले आहे. या कार्यक्रमात पहिल्यापासूनच चिनी कर्मचाऱयांनी मास्क लावून हजेरी लावलेली आहे. यावेळी वाहन मेळाव्यात फोर्ड, बीएमडब्लू, टोयोटा, ऑडी जीप, वॉल्वो, लेक्सस आणि होंडा यासारख्या 9 कंपन्यांनी मात्र आपला सहभाग घेतलेला नाही. परंतु चीनमधून ग्रेट वॉल मोटर्स आणि एमजी अशा कंपन्यांनी प्रथमच सहभाग नोंदवला आहे.  

मारुतीचे 10 लाख पर्यावरणपूरक

कार निर्मितीचे ध्येय

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया आगामी काही वर्षांमध्ये दहा लाख पर्यावरणपूरक वाहनांची निर्मिती व विक्री करण्याचे ध्येय असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने बुधवारी याबाबतची माहिती दिली आहे. देशात पर्यावरण अनुकूल परिवहनला चालना देण्यासाठी कंपनी योजना आखणार असल्याचे कंपनीचे सीईओ केनिची आयुकावा यांनी सांगितले आहे. मागील दशकात कंपनीने सीएनजी आणि स्मार्ट हायब्रिड पर्याय असणारी वाहने या अगोदरच दहा लाख विक्री केली आहेत. सध्या सुरु असणाऱया वाहन मेळा 2020 मध्ये कान्सेप्ट कार ‘फ्यूचरो-ई’ सादर केली आहे.

Advertisement
Tags :
×

.