For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात फुटबॉल विश्वचषकाचे प्रसारण ‘झी’ करणार

06:18 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतात फुटबॉल विश्वचषकाचे प्रसारण ‘झी’ करणार
Advertisement

वृत्तसंस्था 

Advertisement

नवी दिल्ली : ‘फिफा’ने भारतातील ’झी एंटरटेनमेंट’सोबत फिफा 2026 विश्वचषकाचे देशांतर्गत प्रसारण करण्यासाठी एक करार केला आहे. या स्पर्धेचे प्रसारण हक्क अद्याप विकले गेले नव्हते, अशा जगातील काही मोजक्याच मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात ही स्पर्धा पाहायला मिळण्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तिढा या करारामुळे सुटला आहे. या कराराच्या आर्थिक तपशीलांचा मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.

रॉयटर्सने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, फिफाने सुऊवातीला 2026 आणि 2030 या दोन्ही विश्वचषकांसाठीच्या भारत पॅकेजकरिता सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली होती. मात्र नंतर त्यांनी ही मागणी कमी करून 60 दशलक्ष डॉलर्सवर आणली होती. या करारामुळे ‘झी’ला भारतातील क्रीडा प्रसारण बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. या बाजारपेठेत, रिलायन्स आणि डिस्ने यांच्या संयुक्त उपक्रमाचा भाग असलेल्या ‘जिओ स्टार’कडे आयपीएलपासून ते इंग्लिश प्रीमियर लीगपर्यंतच्या विविध स्पर्धांचे प्रसारण हक्क आहेत.

Advertisement

ही स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या 10 दिवस आधी हा करार करण्यात आला आहे. ही स्पर्धा 11 जून रोजी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे. या घोषणेनंतर ‘झी’च्या समभागांच्या किमतीत सुमारे 7 टक्क्यांची वाढ दिसून आली. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या ’जिओ स्टार’ने, ज्यांनी आपल्या आधीच्या ‘वायकॉम 18’ या कंपनीमार्फत 2022 च्या विश्वचषकाचे प्रसारण केले होते, या हक्कांसाठी सुमारे 20 दशलक्ष डॉलर्सची बोली लावली होती. मात्र ‘फिफा’ने ती नाकारली होती, असे रॉयटर्सने यापूर्वी दिलेल्या वृत्तात नमूद केले होते. 2014 आणि 2018 च्या विश्वचषकांचे प्रसारण हक्क ज्यांच्याकडे होते त्या सोनी कंपनीनेही यासंदर्भात चर्चा केली होती, मात्र त्यांनी प्रत्यक्ष बोली लावली नाही.

भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. या करारामुळे 2026 फिफा विश्वचषकाचे भारतात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सदर थेट प्रक्षेपण ‘झी एंटरटेनमेंट’द्वारे त्यांच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या ’युनाइट 8 स्पोर्ट्स’ नेटवर्कवर केले जाईल, तर थेट स्ट्रीमिंग ‘झी 5’वर उपलब्ध असेल. यामध्ये बहुभाषिक कव्हरेजचा समावेश असेल, ज्याचा उद्देश संपूर्ण भारतात स्पर्धा पाहण्याची संधी उपलब्ध करणे आणि चाहत्यांचा सहभाग वाढवणे हा आहे.

Advertisement

.