बॉलिवूडच्या दुनियेत बिश्नोईची दहशत !
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले अभिनेते, चित्रपट निर्माते आणि बड्या व्यक्तींना टार्गेट करण्याचे काम चिंधीचोर बिश्नोई टोळीने सुऊ केले आहे. सलमान खानवरील हल्ल्याच्या कटाशी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबाराशी, आमिर खानला दिलेल्या धमकीशी आणि आता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणाशी चिंधीचोर बिश्नोईचे नाव जोडले गेल्याने संपूर्ण बॉलिवूड दहशतीत असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रसिद्ध अभिनेता तसेच फिटनेस फ्रेन्की असलेल्या टायगर श्रॉफवर जुहू येथे गोळीबार झाल्याने बॉलिवूडमध्ये एकच दहशत पसरली आहे. तरूण-तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारात तो वाचला आहे. मात्र या गोळीबारामुळे सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात चिंधीचोर असलेल्या बिश्नोई टोळीच्या तिघांच्या राजस्थान पोलिसांच्या मदतीने मुसक्या आवळल्यात. या तिघांना मुंबईत आणण्याची प्रक्रीया सुऊ आहे. दुसरीकडे या मारेकऱ्यांना पकडण्याचे केविलवाणे श्रेय घेण्याचा प्रयत्न राजस्थान पोलीस करीत आहेत. पण त्यांना माहीत नाही बाप तो बाप असतो. मुंबई पोलिसांच्या माहितीवऊन हे अटकसत्र झाल्याचे अवघ्या देशाला माहीत आहे. यामुळे राजस्थान पोलिसांनी अशाप्रकारचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत आणि मेरठसारख्या घटना पुन्हा होऊ नयेत, याकडे लक्ष द्यावे. तर दुसरीकडे दबंग अभिनेता सलमान खान पासून ते टायगर श्रॉफपर्यंत प्रसिद्ध अभिनेत्यावर हल्ला करून बॉलिवूडमध्ये दहशत पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न चिंधीचोर बिश्नोई गँग करीत आहे.
चिंधीचोर बिश्नोई गँगला मुंबई पोलिसांचा इतिहास आणि त्यांचा धडाका अद्याप माहीत नाही. मुंबई पोलिसांचा इतिहास माहीत असता तर या चिंधीचोरांनी मुंबईकडे वाकडी नजर केली नसती. भले-भले अंडरवर्ल्ड मुंबई पोलिसांनी ठेचून काढले. सध्या या अंडरवर्ल्डचे नामोनिशान मुंबईत आढळत नाही. भले-भले तिसमारखान पाय लावून मुंबईच्या बाहेर आश्रीतासारखे राहात आहेत. तर या चिंधीचोर बिश्नोई गँगची काय बिशाद! सध्या तरूण तसेच अल्पवयीन मुलांना सोशल मीडीयावऊन
हायजॅक करायचे. त्यांना अॅक्शन स्वऊपाची स्वप्ने दाखवायची. त्यांच्या उसळत्या रक्ताचा फायदा घ्यायचा आणि आपण नामानिराळे राहायचे. हा धंदा या चिंधीचोर बिश्नोई गँगने सुऊ केला आहे. दुसरीकडे आम्ही देशभक्त असल्याची आवई उठवायची. बस्स बाकी काही नाही. आता बॉलिवूडमध्ये दहशत पसरवायची आणि नंतर खंडणी मागायची. हा धंदा सुऊ झाला आहे. तो बिश्नोईनी सुऊ केला आहे. याचा फायदा या चिंधीचोर बिश्नोईचे नाव पुढे करीत इतरांनी घेण्यास सुऊवात केली आहे.
चिंधीचोर बिश्नोईला काही कऊन स्वत:चे अस्तित्व टिकवायचे आहे. यासाठी त्यांनी दबंग अभिनेता सलमान खान, आमिर खान, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि टायगरश्रॉफ यांना लक्ष्य करण्यास सुऊवात केली आहे. एवढेच नाही तर जे सलमान खान याच्याबरोबर काम करतील त्यांनादेखील धमकी देण्याचे सत्र या चिंधीचोरांनी सुऊ केल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. जॅकी श्रॉफ यांचा टायगर श्रॉफ हा मुलगा. आपल्या फिटनेस आणि अभिनयाने त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:चा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. अशातच रविवार असल्याने, तो जुहू येथील एका क्लबमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळून झाल्यानंतर तो आपल्या गाडीने परत येत असताना त्याचे चाहते रस्त्याच्या बाजुला उभे होते. अशातच आलेल्या तिघांनी अचानक टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुऊवात केली. या गोळीबारात टायगर, त्याचा ड्रायव्हर आणि आणखी एकजण हे किरकोळ जखमी झाले. मात्र या गोळीबाराने मुंबईसह देश तर हादरलाच मात्र संपूर्ण बॉलिवूड दहशतीखाली आले. तर तत्काळ मुंबई पोलिसांनी पंधरा पथके तयार केली. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची माहिती देत मारेकऱ्यांना पकडण्याच्या सूचना केल्या. तर एकेकाळ क्राईम ब्रँच गाजविलेले पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी तत्काळ त्यांचे गोपनीय खबरे कामाला लावले.
अवघ्या काही वेळातच हे तीन मारेकरी सुरतच्या दिशेने पळाले असून, ते पुढे कुठेही जाऊ शकतात, याची भणक पोलीस आयुक्तांना लागली. त्यांनी तत्काळ सुत्रे हलवली असता हे तीन मारेकरी पुणे-जयपूर रेल्वेत बसले आणि राजस्थानच्या दिशेने जाऊ लागले. यावेळी पोलीस आयुक्तांनी तत्काळ राजस्थान पोलिसांना याची कल्पना दिली. राजस्थान पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या ते मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीवर. हे तिघे अटक झाल्याची माहिती संपूर्ण देशाला देताना राजस्थान पोलिसांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा केविलवाणा प्रयत्न ते करीत असल्याचे अक्षरश: त्यांच्या चेहऱ्यावऊन दिसत होते. असो, टायगर श्रॉफवर हल्ला करणारे मारेकरी पकडले गेल्याने बॉलिवूडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी मुंबई पोलिस लवकरच या हल्यामागील कारण शोधतील.
दुसरीकडे प्रसिद्धीचे वलय असलेल्या व्यक्तींना टार्गेट करीत स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न या चिंधीचोरांचा सुऊ आहे. यापूर्वी पंजाबी रॅपर गायक सिद्धु मुसेवाला याचीदेखील हत्या या चिंधीचोरांनी घडवून आणली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या गोल्डी ब्रार यांनी या हत्येची जबाबदारी घेतली. येथूनच बिश्नोई गँग बऱ्यापैकी देशात नावाऊपाला आली. सिद्धु मुसेवाला याच्या हत्येचा तपास सुऊ असतानाच बॉलिवूडमध्ये दबंग अभिनेता अशी ओळख असलेल्या सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा उपदव्याप बिश्नोई गँगने केला. त्यानंतर चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहीत शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार, अभिनेता आमिर खान याला धमकी. त्यानंतर आता टायगर श्रॉफ. एकक्षण असे वाटते की बिश्नोई गँगच्या खांद्यावर बंदुक ठेवुन अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय तर होत नाही ना? पण नाही. अंडरवर्ल्डची अशी नांगी ठेचली आहे की पुन्हा ते वर मान काढू शकणार नाहीत. कारण बॉलिवूड व अंडरवर्ल्ड यांचा संबंध फार जुना आहे. 1992 च्या पूर्वी अनेक अभिनेतेदेखील दाऊदचा पाहुणचार घेण्यासाठी दुबईत जात होते. दाउदला कोणतीही अभिनेत्री आवडली तर तो तिला तत्काळ दुबईला बोलावून घेत असे. यामध्ये मंदाकिनी या अभिनेत्रीचे नाव अनेकदा चर्चेत होते. ज्याप्रमाणे, दाऊदची दहशत
बॉलिवूडमध्ये होती, अगदी त्याचप्रकारची दहशत छोटा राजनने देखील करण्यास सुऊवात केली होती. याकरीता त्याने अनेक आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांना खंडणीसाठी धमकाविले होते. एवढेच नाही तर सध्या पॅरोलच्या मागे लागलेला गँगस्टर अबु सालेमने देखील बॉलिवूडमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमाविण्यासाठी आलेल्या मोनिका बेदीशी त्याने लग्न देखील केले होते. तर काहीनी बॉलिवूडमधील आपले स्पर्धक संपविण्यासाठी अनेकदा अंडरवर्ल्डची मदत देखील घेतली आहे. गुलशन कुमारमुळे आपले अस्तित्व धोक्यात आहे, याची जाणीव झालेल्या नदीम याने अबु सालेमला गुलशन कुमार हत्येची सुपारी दिली होती. सालेमने 12 ऑगस्ट 1997 साली अंधेरी येथील चार बंगला परिसरात असणाऱ्या शिवमंदिरासमोर गुलशन कुमार यांची हत्या केली होती. या हत्येमुळे संपुर्ण बॉलिवूड जगत हादऊन गेले होते. यामुळे बॉलिवूड-अंडरवर्ल्ड यांचे नाते खुप जुने आहे. नेमके याच नात्याचा फायदा चिंधीचोर बिश्नोई गँगने उठवित बॉलिवूडमध्ये दहशत पसरविण्यास सुऊवात केली आहे.
अमोल राऊत
