For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बीएसएनएल’चे 4-जी ग्राहक 8 लाखांच्या घरात

06:25 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘बीएसएनएल’चे 4 जी ग्राहक 8 लाखांच्या घरात
Advertisement

3500 पेक्षा अधिकच्या 4 जी टॉवरची स्थापना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारी मालकीची दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या 4 जी ग्राहकांची संख्या 8,00,000 वर पोहोचली आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश या उत्तर भारतीय क्षेत्रांमध्ये रोलआउटच्या सुरुवातीच्या टप्प्यात 4 जी ग्राहकांची ही संख्या गाठली गेली आहे.

Advertisement

दूरसंचार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि सरकारच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डीओटी) यांच्या सहकार्याने विकसित स्वदेशी नेटवर्कच्या तैनातीनंतर हे घडले आहे.

अधिकाऱ्याने बीएसएनएलच्या 4जी उपयोजन आणि त्यानंतरच्या 5जी रोलआउट संदर्भात अधिक अचूक वेळापत्रक देखील दिले. या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्हाला आशा आहे की ऑगस्टपर्यंत या नेटवर्कचा मुख्य भाग पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागात स्थापित होईल. देशव्यापी लाँच सणासुदीच्या काळात होणार आहे, त्यानंतर पुढील 12 महिन्यांत 5जी सेवा सुरू होईल. बीएसएनएलने 3,500 पेक्षा जास्त 4जी टॉवर्स स्थापित केले आहेत आणि 20,000 टॉवर्सपर्यंत पोहोचल्यावर संपूर्ण देशभरात पूर्ण क्षमतेने व्यावसायिक होण्याची योजना आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की कंपनी 12 ते 24 महिन्यांत 10 कोटी 4 जी ग्राहक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.

Advertisement
Tags :

.