For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजारातील 4 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 1.43 लाख कोटींची वाढ

06:22 AM Aug 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाजारातील 4 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 1 43 लाख कोटींची वाढ
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यातील पाच दिवसांच्या सत्रात चढ उतार पाहायला मिळाला. यादरम्यान पाहता बाजारातील 10 पैकी 4 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 1 लाख 43 हजार कोटींची वाढ झालेली दिसून आली. यात सरकारी क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्य सर्वाधिक वाढलेले दिसले.

मागच्या आठवड्यात पाहता बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 404 अंकांनी वाढत बंद झाला होता तर निफ्टी 187 अंकांनी वाढत बंद झाला. एफ अँड ओ समभागांसाठी नवे क्लोजिंग ऑक्शन सेशन अर्थात सीएएस, आरबीआयच्या बैठकीतील निर्णय व जगातील अस्थिर स्थितीत गुंतवणूकदार सावधगिरी बाळगून होते. देशातील 10 आघाडीवरच्या कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रिज, एसबीआय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व लार्सन अँड टुब्रो यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात वाढ झाली होती. तर भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एलआयसी व हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवलात मात्र घट झालेली दिसली होती. या 6 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मात्र 1.23 लाख कोटींची घसरण झालेली दिसली.

Advertisement

Advertisement
Tags :

.