For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

फोल्डेबल गॅलेक्सी झेड फ्लिपचे बुकिंग सुरू

04:46 PM Feb 22, 2020 IST | Tarun Bharat Portal
फोल्डेबल गॅलेक्सी झेड फ्लिपचे बुकिंग सुरू

किमत 1,09,999 रुपये : 26 फेब्रुवारीला फोन उपलब्ध होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सॅमसंग कंपनीचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन ‘गॅलेक्सी झेड फ्लिपचे प्री बुकिंग 21 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आले असून फोनची डिलिव्हरी 26 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. गॅलेक्सी झेड फ्लिपची किंमत 1,09,999 रुपये आहे. सदरचा स्मार्टफोन मिरर पर्पल, मिरर ब्लॅक आणि मिरर गोल्ड या तीन रंगात विक्री होणार असून हा स्मार्टफोन 12 महिन्यांच्या विना व्याज हप्त्यामध्ये उपलब्ध करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे.

Advertisement

दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन

Advertisement

सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी फोल्डेबलनंतर दुसरा फोल्डेबल स्क्रीनचा स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फ्लिप मॉडेल ‘अल्ट्रा थिन ग्लास’च्या मदतीने निर्मिती केली आहे. या फोनची स्क्रीन प्लास्टिक स्क्रीनपेक्षा अधिक मजबूत राहणार आहे. परंतु पहिल्या पेक्षा हा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन वेगळा असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

सुविधा

मुख्य स्क्रीन : मेन डिस्प्ले 6.7 इंच पूर्ण एचडी  डायनामिक एमोलेड, 1.1 इंच सुपर डिस्प्ले

रियर कॅमेरा : 12 एमपी वाइल्ड ऍगल  12 एमपी वाइल्ड
 आयओएस

फ्रन्ट कॅमेरा : 10 एमपी

वजन :183 ग्रॅम

सुरक्षा : साइड फिंगरप्रिंन्ट स्कॅनर, फेस रिकग्निशन

प्रोसेसर : 7एनएम स्नॅपड्रगन855

इंटरनल स्टोरेज : 265 जीबी

रॅम : 8 जीबी बॅटरी : 3,300 एमएएच(930+2,370 एमएएच)

Advertisement
Tags :
×

.