For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पशुवैद्यकीय अधिकारी भरतीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकली

06:30 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पशुवैद्यकीय अधिकारी भरतीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकली
Advertisement

प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आयएएस अधिकारीच

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

केपीएससीमार्फत पशुवैद्यकीय अधिकारी भरती परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. केपीएससीच्या परीक्षांचे नियंत्रक म्हणून काम केलेले आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार हेच भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीमागील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तर मध्यस्थ म्हणून काम करणारा तुमकूर विद्यापीठाचा सिंडीकेट सदस्य व एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा साहाय्यक बसवराज कन्नाळे याने परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी 40 लाख रुपयांना विकल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

पशुवैद्यकीय अधिकारी भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिक फुटी प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू आहे. या प्रकरणी सीआयडीने आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार व बसवराज कन्नाळे यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांना बेंगळूरला आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली.

प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तपासावेळी महत्त्वाची माहिती सीआयडीच्या हाती लागली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे नियंत्रक म्हणून काम पाहिलेल्या ज्ञानेंद्र कुमार हेच प्रश्नपत्रिका फुटीमागील सूत्रधार आहेत. ज्ञानेंद्र कुमार यांनी प्रश्नपत्रिका फोडून ती मध्यस्थ व बिदर जिल्ह्यातील बसवराज कन्नाळे यांच्यामार्फत प्रत्येकी 40 लाख रुपयांना विक्री केली. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी ओएमआर शीटमध्ये फेरफार आणि स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्याचा प्रयत्न केला होता.

केपीएससीच्या सदस्याविरुद्ध ‘लुट आऊट’ नोटीस

पशुवैद्यकीय अधिकारी भरती गैरव्यवहार प्रकरणी केपीएससीच्या सदस्या शांता होसमनी यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘लुट आऊट’  नोटीस जारी केली आहे. शांता होसमनी यांना या प्रकरणात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्या अज्ञात स्थळी असल्याने त्यांच्या शोधासाठी ईडीने लुक आऊट नोटीस जारी केली आहे. नोटिशीची प्रत देशातील सर्व विमानतळांना पाठविण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.