For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पुष्पा 2.0 बघाय लागतंय…

04:07 PM May 14, 2022 IST | Rohit Salunke
पुष्पा 2 0 बघाय लागतंय…

मित्रांनो पुष्पा चित्रपट आपण सगळयांनी एकदा नवे दोन दोनदा बघितलाय आपला पुष्पा भाऊ म्हणजे अल्लो अर्जुन यान अख्खा महिना थियटर गाजविलाय. पण तो पुष्पा भाऊ होता फ्ढक्त चित्रपटात. असाच एक पुष्पा खरोखरच अवतरलाय. पुष्पा 2.0 म्हणजे आपण बोलतोय युपेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या बद्दल.

Advertisement

कितीतरी दिवस उलटले तरी त्यांनी पाय माग घेतला नाय. झुकेगा नाय. असं म्हणत आपला लढा सुरूच ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांना युक्रेनच्या सगळया लोकांनी पाठिंबा दिला आहे. पुतिन यांनी या छोटयाशा देशाचे येवढे नुकसान केले तरीबी ते मागे सरले नाहीत. एक ना एक दिवस आपला ऐईल या विश्वासाने युक्रेन बलाढय रशियाशी रात्रंदिवस झुंझत आहे. दारू गोळा कमी पडतोय असं समजताच देशातील प्रत्येक नागरिक पेट्रोल बाँम्ब तयार करत आहेत. त्याचबरोबर परदेशात असलेले युक्रेनचे लोक आपल्या देशाच्या मदतीला धावून आले. त्यांनी आपल्याला जमेल तेवढी आर्थिक मदत केली आहे.

ते सगळ ठिक आहे वो, पण रशिया आणि युपेनमध्ये चाललेल्या युद्धादरम्यान चर्चा होतेय ती एका कॉमेडियनची. तुम्ही म्हणत असाल युध्दात कॉमेडीयन कसं काय ? त्याचा युद्धाशी काय संबंध ? तुम्हाला वाटत असेल युध्दा आणि स्टँडप कॉमेडी याचा सुताचाबी संबंध लागत नाही. पण संबंध आहे बर का. अनिल कपुर यांच्या नायक चित्रपटातील हिरो सारख युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी जगासमोर एक नवा पायंडा पाडलाय. त्यांचा प्रवास स्टँडप कॉमेडियन ते युपेनचे राष्ट्रपती असा राहिलाय.

Advertisement

वोलोदिमीर जेलेंस्की यांचा जन्म 25 जानेवरी, 1978 ला युक्रेनमध्ये झाला. यांचे वडील प्रोफेसर आणि आई पेशाने इंजीनियर होत्या. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइल मध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु नेहमीप्रमाणे वडिलांची परवानगी दिली नाही.

Advertisement

कॉमेडी चे शौकीन -

एक काळ असा होता की, वोलोदिमीर आपल्या कॉमेडी स्टाईलसाठी प्रसिद्ध होते. याची सुरुवात शिक्षण घेत असताना झाली. ही कला त्यांच्या अंगी आधी पासनच होती. याची जाणीव त्यांना शिक्षण घेताना झाली. त्यांनी आपल्या मित्रांसमवेत ‘क्वार्टल 95’ नावाचा एक कॉमेडी ग्रुप बनवला. लोकांनी वोलोदिमीर यांच्या कामाला खूप पसंती मिळाली. ज्याचा परिणाम असा झाला की, त्यांनी कार्यक्रमाच्या सुपाऱया घ्यायला सुरू केले.

टिव्ही शोमुळे बदलले आयुष्य -

Servant of the People या टिव्ही शोने त्यांचे आयुष्य बदलले. हा शो प्रचंड लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमात झेलेन्स्कींनी राष्ट्रपतीचं पात्र रंगवलं होतं. त्यात ते भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवतात, यातलं त्यांचं भाषण प्रचंड व्हायरल होते. काही काळानंतर त्यांची राष्ट्रपती पदासाठी निवड होते, असं त्यात दाखवलं. हा शो लोकांना प्रचंड आवडला. लोकांनी झेलेनस्कींना खुप पसंती दिली. लोकांनी खुप विनंत्या केल्यावर अखेर अभिनेता व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना देशाच्या राजकारणात यावे लागले. या नाटकाच्या नावाचा वापर करत त्यांनी आपल्या नव्या पक्षाचे नाव 'Servant of the People' मराठीत सांगायचं तर लोकांचे सेवक असं ठेवलं. त्याच्या निवडणूक भाषणांमुळे युपेनचे लोक खूप प्रभावीत झाले. परिणामी झेलेन्स्कींनी प्रचंड विजय मिळवला आणि युपेनचे राष्ट्राध्यक्ष बनले. तब्बल 73 % वोट मिळवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि देशाचे राष्ट्रपती पद भूषविले.

राजकारणाचा अनुभव नाही -

आता परिस्थिती अशी आहे की युपेन आणि रशिया यांच्यातील या लढतीत एकीकडे स्टँड-अप कॉमेडियन राष्ट्रपती व्होलोदिमिर झेलेन्स्की असून ज्यांना राजकारणाचा फार अनुभव नाही, तर दुसरीकडे दुसरे सर्वात जास्त काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले व्लादिमीर पुतिन आहेत. युद्ध असंच वाढत राहिलं तर युपेनचे अस्तित्व टिकणे कठीण आहे. पण ते काय बी असू दया. युक्रेनच्या लोकांनी अजुन काय आशा सोडली नाय. तसेच या सगळयात स्टँड-अप कॉमेडियनपासून राष्ट्रपतीपर्यंत व्होलोदिमिर झेलेन्स्कींचा प्रवास थक्क करणारा आहे. आजही ते पुष्पा भाव सारखं झुकेगा नाही. असं म्हणत रणसंग्रामात उभे ठाकले आहेत.

Advertisement
×

.