For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटकांची अशीही फसवणूक

06:22 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
पर्यटकांची अशीही फसवणूक
Advertisement

पर्यटन हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. अनेक लोक भारतात सर्वत्र आणि जगभरात कोठेही त्यपर्यटनाला जात असतात. विशेषत: पुरातन ऐतिहासिक स्थळांना भेट देणे आणि विविध तीर्थक्षेत्रांच्या स्थानी जाऊन पूर्जाअर्चा करण्याचा छंद काहीजणांना असतो. पर्यटकांच्या या मानसिकतेचा इटलीतील एका व्यक्तीने अशा प्रकारे दुरुपयोग करून प्रचंड पैसा कमावला. नंतर या कारस्थानाचा पर्दाफाश करण्यात आला. या बनेल व्यक्तीचे नाव फ्रँको मालोसो असे आहे. त्याने इटलीच्या एका फारशा परिचित नसलेल्या गावात एका प्राचीन भासणाऱ्या ‘एँफी थिएटर’चे बांधकाम स्वत:च केले. या वास्तूत त्याने स्वत: किंवा इतर कारागिरांनी निर्माण केलेल्या प्राचीन ग्रीक आणि इटालियन पद्धतीच्या वस्तूही ठेवल्या. नंतर, आपण एक प्राचीन अँफी थिएटर उत्खनन करुन शोधून काढले आहे, अशी जाहिरात त्याने केली. साहजिकच ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ तेथे वळू लागला.

Advertisement

प्रारंभी प्रतिसाद कमी होता. तथापि, मालोसो याने हे निर्माणकार्य प्राचीन काळातील अँफी थिएटरप्रमाणेच केले. दोन्हींमधील साम्य विलक्षण आहे. त्यामुळे पर्यटकांना ही वास्तू प्राचीन असल्याचेच वाटत होते. त्यामुळे ते वाढत्या संख्येने येऊ लागले. मालोसो याने प्रत्येक पर्यटकाकडून 4 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क स्वीकारण्यास प्रारंभ केला. त्याचा हा ‘धंदा’ कोणाच्याही लक्षात तब्बल 10 वर्षे आला नाही. या काळात त्याने कोट्यावधी रुपयांची कमाई केली, असे दिसून येत आहे. अखेर तेथील प्रशासनाचे त्याच्या वास्तूकडे लक्ष गेले आणि या अँफी थिएअरवर प्रशासनाची धाड पडली. त्याचे सखोल अन्वेषण करण्यात आले. त्यावेळी हा बनाव उघड झाला. त्याला अटक करण्यात येऊन त्याच्या विरोधात पर्यटकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला. रीतसर अभियोग चालून आता नुकतीच त्याला 8 वर्षे कारावासाची शिक्षा झाली, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.