For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परदेशात गुंतवणूक करताना...

01:54 AM Apr 13, 2020 IST | Tarun Bharat Portal
परदेशात गुंतवणूक करताना
Advertisement

कोरोना उद्भवण्यापूर्वीच भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण केले जात
होते. त्यात आता कोरोनाची भर पडून अर्थव्यवस्था
आणखीनच नाजूक झाली. दि इंटरनॅशनल मोनेटरी फंड (आयएमएफ) ने भारताचा 2019-2020 साली विकास
दर 4.8 टक्के असेल असे म्हटले आहे. अगोदर तो 8.1 टक्के होता. मुडीज इन्क्हेस्टर्स सर्व्हिसनेही
भारताच्या आर्थिक वृद्धीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचे परिणाम कॉर्पोरेट्सना तसेच
सामान्य गुंतवणूकदारांना भोगावे लागणार आहेत. या परिस्थितीत तुम्हाला परदेशात गुंतवणूक
करायचा विचार सुचल्यास?

Advertisement

परदेशात
ज्या देशात गुंतवणूक करणार तेथील आर्थिक वृद्धीचा दर, चलनवाढीचा दर, त्या देशाच्या
चलनाचे मूल्य, गुंतवणुकीवर मिळणारे व्याज यानुसार गुंतवणुकीतील जोखीम व मिळणारा परतावा
याचे चित्र स्पष्ट होते.

भारतीय
गुंतवणूकदार परदेशात म्युच्युअल फंड, एक्स्चेंज टेडेड फंड, शेअर तसेच स्थिर प्रॉपर्टी
यात गुंतवणूक करू शकतो.

Advertisement

म्युच्युअल फंड

इंटरनॅशनल
फंड्स आणि फंड ऑफ फंड्सद्वारे गुंतवणूकदार जागतिक बाजारपेठेत गुंतवणूक करू शकतो. काही
आंतरराष्ट्रीय फंड्सनी भारतातील फंड्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बऱयाच युएस इक्विटी
फंड्स गेल्या तीन वर्षात 15 टक्क्मयांहून अधिक दराने परतावा दिला आहे. 2006 ते
2008 भारतीय रुपया, युएस डॉलरच्या तुलनेत मजबूत होता. पण सध्याच्या परिस्थितीत रुपया
तितका मजबूत राहिलेला नाही, हा मुद्दा गुंतवणूकदारांना विचारात घ्यावा लागेल. यात गुंतवणूक
करणाऱयाला अनुभव पाहिजे किंवा तज्ञांच्या मदतीनेच गुंतवणूक करावी. भारतातील म्युच्युअल
फंडात गुंतवणूक योग्य आणि पूर्ण झाल्यानंतर परदेशी म्युच्युअल फंडांवर विचार करावा.

शेअरमध्ये थेट गुंतवणूक

तुम्ही
परदेशी कंपन्यांचे शेअर थेट विकत घेऊ शकता. पण ही गुंतवणूक त्या देशाच्या फॉरेन एक्स्चेंजीस
व ब्रोकिंग हाऊसेसच्या मार्फतच करावी लागते. बऱयाच भारतीय ब्रोकिंग हाऊसेसचा परदेशातील
ब्रोकर्सबरोबर सामंजस्य करार आहे. यामुळे भारतीय गुंतवणूकदाराला परदेशी शेअर विकत घेता
येऊ शकतात. पण म्युच्युअल फंडात गुंतवणुकीपेक्षा शेअर खरेदी गुंतवणूकदाराला जास्त खर्च
येतो. डिमॅट खाते उघडून त्यावर खर्च करावा लागतो. ब्रोकरेजवर खर्च करावा लागतो. चलनाचे
दुसऱया देशाच्या चलनात रुपांतर करण्यासाठी खर्च करावा लागतो.

रियल इस्टेट

रियल
इस्टेटमध्ये गुंतवणूक केली तर त्या देशाच्या नियमांप्रमाणे त्या देशाचे नागरिकत्व मिळू
शकते. त्या देशातील सामाजिक फायदे मिळू शकतात. अनिवासी भारतीय जे परदेशात नोकरी किंवा
व्यवसाय करतात, अशांनी परदेशात स्थिर संपत्तीत गुंतवणूक करावी. जे परदेशात स्थायिक
झालेले आहेत किंवा ज्यांना परदेशात स्थायिक व्हायचे आहे किंवा जे भारतात गडगंज श्रीमंत
आहेत अशा व्यक्ती परदेशात रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. परदेशात रिअल इस्टेटमधील
व्यवहार हे भारतापेक्षा जास्त पारदर्शक असतात. त्यामुळे तेथे यातील गुंतवणूक प्रक्रिया
सोपी असते व जलद होते. यात गुंतवणूकदारांना तेथील स्थानिक कायदे व स्थानिक कर त्यांच्या
नियमांप्रमाणे भरावेच लागतात. गुंतवणूकदार तेथे त्या प्रॉपर्टीत राहणार असेल तरच परदेशात
स्थिर प्रॉपर्टीत गुंतवणूक करावी.

गुंतवणुकीची मर्यादा

परदेशात
किती गुंतवणूक करण्याबाबत केंद्र सरकारचे नियम आहेत. फंड ऑफ फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी
काही मर्यादा नाही. कारण यात तुम्हाला परदेशात काही रक्कम पाठवावी लागत नाही. तुम्ही
यात भारतात कार्यान्वित असलेल्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीमार्फत गुंतवणूक करू शकता. जर
रियल इस्टेट किंवा शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लिबरलाईज्ड
रेमिटन्स योजनेनुसार, आर्थिक वषी 2 लाख 50 हजार युएस डॉलर इतक्मया रकमेपर्यंतच गुंतवणूक
करता येते.

कर

परदेशी
कंपनीच्या शेअरमध्ये दोन वर्षे गुंतवणूक असेल तर ती गुंतवणूक लाँग-टर्म कॅपिटल गेन्स
(एलटीसीजी) ठरते. भारतीय कंपन्यांकडून तसेच परदेशी कंपन्यांकडून मिळणाऱया लाभांशावर
चालू आर्थिक वर्षापासून एकाच दराने कर भरावा लागणार आहे. भारतातील आयकर कायद्यानुसार
भारतीयाला आयकर रिटर्न फाईल करताना परदेशी बँकांतील सर्व खात्यांचा तपशील द्यावा लागतो.
तसेच काही स्थिर प्रॉपर्टी परदेशात असेल तर त्याचाही तपशील द्यावा लागतो. या गुंतवणुकीतून
उत्पन्न मिळत नसले तरी तपशील द्यावाच लागतो. कॅपिटल गेन असेल तर कर भरावा लागतो. प्रॉपर्टी
भाडय़ाने दिली असेल तर ते उत्पन्नही करपात्र असते. जर दोन्ही देशात कर भरलेला असेल तर
गुंतवणूकदाराला ‘डबल टॅक्सेशन अव्हॉयडन्स’ करारानुसार सवलत मिळू शकते. परदेशात कसलीही
गुंतवणूक करण्यापूर्वी करविषयक सर्व नियम या विषयातील तज्ञांकडून माहिती करून व जाणून
घ्यावे. नाहीतर अज्ञानाने आयकर खात्याचा ससेमिरा मागे लागून तुमचे जगणे मुश्कील करून
टाकेल, हे निश्चित लक्षात ठेवावे. आयकर खाते सामान्यांनाच जास्त त्रास देते. बाकीचे
पैसेवाले या खात्याला तुरी देऊन परदेशात वास्तव्य करून या खात्याला वाकुल्या दाखवितानाचे
चित्र या देशात आपण पाहतच आहोत. सत्ता कोणाचीही असो यात बदल नाही! त्यामुळे सामान्यांनी
सावध रहावे!

- शशांक मो. गुळगुळे

9920895210

Advertisement
Tags :

.