For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नायरा एनर्जी’कडून इंधन दरात कपात

06:32 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘नायरा एनर्जी’कडून इंधन दरात कपात
Advertisement

पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी खासगी इंधन विक्रेता कंपनी, ‘नायरा एनर्जी’ने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी कपात केली आहे. आता नायरा कंपनींच्या वितरण केंद्रांवर पेट्रोलची किंमत 119.79 वरून 114.79 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत 102.57 वरून 99.57 झाली आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात या दरात काही प्रमाणात फरक असणार आहे.

Advertisement

‘नायरा एनर्जी’चे नवीन दर सर्वत्र लागू करण्यात आले आहेत. तथापि, वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक कर आणि मूल्यवर्धित कराचे दर वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक शहरातील किरकोळ दरांमध्ये थोडा फरक असू शकतो. देशभरात नायरा एनर्जीचे 7,000 हून अधिक पेट्रोलपंप आहेत. तर इतर कंपन्यांचे एक लाखांहून अधिक पेट्रोलपंप आहेत. एकंदर ‘नायरा एनर्जी’चा बाजारातील हिस्सा 7 टक्के इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 73 डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिका-इराण युद्धामुळे तेलाचा भाव 100 डॉलरच्या वर गेला होता. हा तणाव कमी झाल्याने आता भाव खाली आले आहेत. मात्र, सध्या, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांनी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Advertisement
Tags :

.