‘द सिक्रेट ऑफ देवकाली’चा ट्रेलर सादर
संजय मिश्रा मुख्य भूमिकेत
नीरज चौहान यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपट ‘द सिक्रेट ऑफ देवकाली’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा एक पौराणिक थ्रिलरपट असून तो माणूस कशाप्रकारे अत्याचार करतोय आणि स्वत:च्या मूळ वृत्तीला कशाप्रकारे विसरून गेला आहे हे यात दाखविण्यात आले आहे. सूड आणि बलिदानाची कहाणी यात दिसून येणार आहे.
संजय मिश्रा यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याच्या ट्रेलरची सुरुवात क्रूरतेने होते, याचा ट्रेलर प्रेक्षकांना भावनात्मकयुक्त प्रवासाच्या दिशेने नेतो, जेथे क्रूरता, बलिदान आणि सूडाचा संगम होतो. हा पौराणिक थ्रिलर चित्रपट शक्ती, श्रद्धा आणि न्यायाला दर्शवितो.
या चित्रपटाचे चित्रिकरण मथुरा, वृंदावन, सूरत यासारख्या ठिकाणी करण्यात आले आहे. या चित्रपटात संजय मिश्रा, महेश मांजरेकर मुख्य भूमिकेत ओत. या चित्रपटाची कहाणी महेंद्र सोनी यांनी लिहिली असून याला संगीत जावेद अली आणि असलम अली शाहने दिली आहे. चौहान प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत याची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट 18 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.