For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी

06:41 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली वाराणसी बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी
Advertisement

दिल्लीतून आग्रा येथे तासात तर लखनौ येथे सव्वादोन तासांत पोहोचता येणार : पाटणा-गुवाहाटीपर्यंत विस्तार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर प्रदेशला लवकरच बुलेट ट्रेन प्रकल्प मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेन नेटवर्कच्या नॉर्दर्न कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. हा नॉर्दर्न कॉरिडॉर दिल्लीपासून सुरू होऊन आग्रा, कानपूर, लखनौ आणि अयोध्या यांना जोडल्यानंतर वाराणसी, पाटणा, सिलीगुडी आणि गुवाहाटीपर्यंत जाईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले. या प्रकल्पामुळे उत्तर प्रदेशातील पूर्वांचलच्या लोकांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हा प्रकल्प राजधानी दिल्लीसोबतच उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसामसाठी पहिला बुलेट ट्रेनने जोडणार आहे. मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरनंतर या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरचा वेगाने विस्तार करण्याचा सरकारचा मानस आहे.

Advertisement

दिल्ली-वाराणसी-गुवाहाटी बुलेट ट्रेनच्या नॉर्दर्न कॉरिडॉरला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती शनिवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. हा नॉर्दर्न कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रवास काही तासांतच पूर्ण होईल. दिल्ली ते आग्रा हा प्रवास एका तासापेक्षा कमी वेळेत, म्हणजेच 59 मिनिटांत पूर्ण होईल. दिल्ली ते कानपूर प्रवासाला 1 तास 45 मिनिटे लागतील, जो दोन तासांपेक्षा कमी असेल. दिल्लीहून बुलेट ट्रेनने प्रवास केल्यास, तुम्ही कानपूरला भेट देऊन संध्याकाळी दिल्लीला परत येऊ शकता आणि आपले काम पुन्हा सुरू करू शकता. दिल्ली ते लखनौ प्रवासाला 2 तास 12 मिनिटे लागतील, असे रेल्वेमंत्री म्हणाले. हा दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर दोन प्रमुख राजधान्यांना जोडेल. वाराणसी ते लखनौ प्रवासाला 1 तास 21 मिनिटे लागतील. वाराणसी ते पाटणा प्रवासालाही एक तास लागेल. तर दिल्ली ते वाराणसी प्रवास साडेतीन तासात पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गही पूर्णत्वाकडे

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सुरत ते विलिमोरा या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पुढील वर्षी 15 ऑगस्टपर्यंत होणार असून, संपूर्ण मार्ग 2029 च्या मध्यापर्यंत खुला करण्याचे नियोजित आहे. या मार्गावर साबरमती, अहमदाबाद, वांद्रे-कुर्ला आणि विरार येथील बुलेट ट्रेन स्थानकांसह एकूण 12 स्थानके बांधली जात आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विलंब झाला असला तरी, मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर सरकार इतर हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पांना पुढे नेईल, असे रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले.

हाय-स्पीड रेल्वेप्रकल्पांना प्राधान्य

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने आपल्या पायाभूत सुविधा योजनेचा भाग म्हणून सात प्राधान्यक्रमाचे हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर निश्चित केले होते. यामध्ये दिल्ली-वाराणसी हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, मुंबई-बेंगळूर, मुंबई-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळूर आणि हैदराबाद-चेन्नई यांसारख्या मार्गांचा समावेश आहे. बुलेट ट्रेनमुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार ते बंगाल आणि आसामला जोडणी मिळेल्यामुळे सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना काम, शिक्षण किंवा वैद्यकीय गरजांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज प्रवास करता येईल आणि हवाई प्रवासाची गरज दूर होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

.