For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण विभागाच्या कर्णधारपदी तिलक वर्मा

06:22 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण विभागाच्या कर्णधारपदी तिलक वर्मा
Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

Advertisement

2026 च्या क्रिकेट हंगामातील होणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभागाचा संघ रविवारी जाहीर करण्यात आला असून तिलक वर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचा अनुभवी क्रिकेटपटू रिकी भुईची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

दक्षिण विभाग संघातून करुण नायरला पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच एस. के. रशिद, कर्नाटकाचा स्मरण आणि हैदराबादचा हिमतेज यांचा दक्षिण विभाग संघात समावेश आहे.

Advertisement

दक्षिण विभाग संघ : तिलक वर्मा (कर्णधार), रिकी भुई (उपकर्णधार), अभिनव तेजराणा, एस. के. रशिद, के. हिमतेजा, आर. स्मरण, एन. जगदीशन, करुण नायर, त्यागराजन, श्रेयस गोपाल, साईतेजा, टी. विजय, टी. कवीरप्पा आणि अमन खान.

Advertisement
Tags :

.