For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेनजिंग नोर्गेवर येणार चित्रपट

06:02 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेनजिंग नोर्गेवर येणार चित्रपट
Advertisement

माउंट एव्हरेस्ट प्रथम सर करणारे महान गिर्यारोहक तेनजिंग नोर्गे यांच्या आयुष्यावर एक चित्रपट निर्माण होणार आहे. याचे नाव ‘तेनजिंग’ असेल आणि या बायोपिक ड्रामापटात टॉम हिडलस्टन आणि गेंडन फुंट्सोक मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अॅपल टीव्हीकडून केली जात आहे. तर दिग्दर्शन ऑस्ट्रेलियन फिल्ममेकर जेनिफर पीडम करतील.

Advertisement

चित्रपटाची कहाणी ल्यूक डेव्हिस लिहिणार आहेत. हा चित्रपट 29 मे 1953 च्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असेल. त्यावेळी शेरपा तेनजिंग नोर्गे आणि न्यूझीलंडचे एडमंड हिलेरी यांनी पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले होते.  तेनजिंग नोर्गेची भूमिका अभिनेता गेंडन फुट्सोक साकारणार आहे, तर एक नेपाळी-भारतीय शेरर्पा गिर्यारोहकाच्या रुपात दिसून येईल. एडमंड हिलेरी यांच्या भूमिकेत हॉलिवूड स्टार टॉम हिडलस्टन दिसून येईल. याचबरोबर विलेम डॅफो, कॅट्रिओना बाल्फे, तेनजिन डल्हा आणि थिनले ल्हामो चित्रपटात काम करणार आहेत. हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर 16 ऑक्टोबरपासून अॅपल टीव्हीवर हा चित्रपट पाहता येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.