तीव्र आवाजाशिवाय उड्डाण करणार सुपरसोनिक विमान
नासाच्या एक्स-59 विमानाची कमाल
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने स्वत:च्या एक्स-59 विमानाचे यशस्वी परीक्षण केले आहे. या विमानाने कॅलिफोर्नियात उड्डाणादरम्यान ध्वनिचा वेग ओलांडला, परंतु सामान्य सुपरसोनिक विमानांप्रमाणे तीव्र सोनिक बूम झाला नाही. या परीक्षणाचा उद्देश कमी आवाजासोबत सुपरसोनिक उड्डाण तंत्रज्ञानाची चाचपणी करणे होता. नासा आणि लॉकहीड मार्टिनने मिळून एक्स-59 विमान तयार केले आहे. परीक्षणादरम्यान या विमानाने सुमारे 1729 किलोमीटर प्रतितासाचा वेग प्राप्त केला. हे उड्डाण सुमारे 55 हजार फुटांच्या उंचीवर झाले आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा एखादे विमान ध्वनिच्या वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करते, तेव्हा जमिनीवर सोनिक बूम म्हणजेच तीव्र स्फोटासारखा आवाज ऐकू येतो. परंतु एक्स-59 ने याच्या जागी केवळ सौम्य ‘सोनिक थंप’सारखा आवाज आला.
एक्स-59 का खास?
जेव्हा एखादे विमान ध्वनिच्या वेगापेक्षा अधिक वेगाने उ•ाण करते, तेव्हा त्याच्यासमोर तयार होणारा हवेचा दबाव तरंग परस्परांमध्ये मिळून मोठ्या स्फोटासारखा आवाज निर्माण करतात. याला सोनिक बूम म्हटले जाते. हा आवाज इतका तीव्र असू शकतो की लोकांना झटका जाणवेल आणि खिडक्या देखील हादरतील. याचमुळे अमेरिकेने 1973 पासून कमर्शियल सुपरसोनिक उ•ाणांवर बंदी घातलेली आहे. एक्स-59 चा पुढील हिस्सा अत्यंत लांब आणि टोकदार निर्माण करण्यात आला आहे. यामुळे हवेचा दबाव हळूहळू फैलावतो, तीव्र स्फोटासारखा आवाज निर्माण होण्याची शक्यता कमी होते. याचबरोबर विमानाचे इंजिन वरच्या दिशेने लावण्यात आल्याने आवाजाचा प्रभाव जमिनीपर्यंत कमी पोहोचतो.
नासानुसार एक्स-59 चा आवाज सुमारे 75 टक्केच असेल, तर कॉनकॉर्डचा आवाज 100 टक्क्यांहून अधिक असायचा. एक्स-59 चा आवाज पूर्वीच्या सुपरसोनिक विमानांच्या तुलनेत खूपच कमी असेल आणि तीव्र सोनिक बूमच्या जागी केवळ सौम्य आवाज ऐकू येईल.
पुढे काय होणार
एक्स-59 हे काही प्रवासी विमान नाही, यात केवळ एक सीट असून ते केवळ परीक्षणासाठी निर्माण करण्यात आले आहे. या विमानातून मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारावर भविष्यात अशाप्रकारचे सुपरसोनिक प्रवासी विमान विकसित केले जाऊ शकते, जे कमी आवाजासोबत उ•ाण करू शकेल. भविष्यातील परीक्षण यशस्वी राहिल्यास सुपरसोनिक प्रवासी उ•ाणांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामुळे दीर्घ पल्ल्याच्या हवाई प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.