For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरंदाजीत पुरुष संघाचेही वर्चस्व , नेमबाज नीरु-चेनाईचा सुवर्णवेध

06:59 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिरंदाजीत पुरुष संघाचेही वर्चस्व   नेमबाज नीरु चेनाईचा सुवर्णवेध
Nagoya: Gold medallist, from left, India's Kushal Dalal, Sahil Jadhav and Ganesh Mani Ratnam Thirumuru pose for photographers during the medal ceremony for the compound men's team archery event at the 20th Asian Games, in Nagoya, Japan, Wednesday, Sept. 30, 2026. (PTI Photo/Arun Sharma) (PTI09_30_2026_000142B)
Advertisement

वृत्तसंस्था/ नागोया

Advertisement

भारताचे क्लीन स्वीप

भारताच्या पुरुष संघानेही कम्पाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले. अंतिम फेरीत चीनविरुद्ध भारताने थरारक विजय मिळवला. भारताच्या संघात साहिल जाधव, कुशल दलाल आणि थिरुमुरु गणेश मणिरत्नम यांचा समावेश होता. या तिघांनी मिळून चीनच्या संघाला 238-237 अशा एका गुणाच्या फरकाने पराभूत केले. भारताची सुरुवात संघर्षमय झाली. पहिल्या गेममध्ये 58 गुण मिळवले होते. मात्र नंतर तिन्ही तिरंदाजांनी 10 गुणांचे अचूक वेध घेतले आणि हे सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे साताऱ्याच साहिल स्टार ठरला. त्याचे सर्व तीर 10 पाँइंट्सचे ठरले. त्याचे हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले. त्याने मिश्र प्रकारातही चिकितासह सुवर्ण जिंकले आहे.

Advertisement

 

साताऱ्याच्या साहिल जाधवचे दुहेरी गोल्ड

साताऱ्याच्या साहिल जाधवने आशियाई गेम्समध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई करत भारताचा नावलौकिक केला. कम्पाऊंड मिश्र सांघिक‘ प्रकाराच्या अंतिम सामन्यात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी या जोडीने दक्षिण कोरियाच्या जोडीचा ‘शूट-ऑफ’मध्ये पराभव करून सुवर्णपदक जिंकले. तसेच पुरुष कम्पाऊंड संघानेही चीनला नमवत सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णपदकाच्या यशात साताऱ्याच्या साहिल जाधवची कामगिरी लक्षवेधी ठरली.

 

नेमबाज नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांना सुवर्ण

बुधवारी भारताचे नेमबाज नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी मिश्र ट्रॅप सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे. अंतिम फेरीत या दोघांनी मिळून 34 गुण मिळवले आणि आशियाई विक्रमही रचला. यापूर्वी कतारने याच स्पर्धेत यापूर्वी 30 गुण मिळवले होते. दरम्यान, अंतिम फेरीत भारताने कतारलाच मागे टाकत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत कतारने 32 गुणासह रौप्य तर चीनने 23 गुणांसह कांस्य पदक मिळवले. दरम्यान मिश्र ट्रॅप सांघिक प्रकारात भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे.

नीरुचे यंदाच्या स्पर्धेतील तिसरे पदक

यंदाच्या आशियाई स्पर्धेतील हरियाणाच्या नीरुचे दुसरे सुवर्ण ठरले तर एकूण तिसरे पदक ठरले आहे. मंगळवारी या युवा नेमबाजाने महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय, महिलांच्या सांघिक प्रकारात तिने आशिमा आणि मनीषा यांच्यासोबत रौप्यपदक जिंकले होते. यानंतर बुधवारी तिने दमदार कामगिरी साकारत मिश्र ट्रॅप सांघिक प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिच्या या यशाचे केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी तिचे कौतुक केले आहे.

बॉक्सिंगमध्ये प्रिया घंगास, कपिल पोखरियाला कांस्य, लोवलिना फायनलमध्ये

बॉक्सिंगमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. बुधवारी झालेल्या महिलांच्या 60 किलो गटात प्रिया घंगासला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला चीनच्या यांगने नमवत अंतिम फेरी गाठली. तर प्रियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, पुरुषांच्या 90 किलो गटात कपिल पोखरियाने उझबेकिस्तानच्या तुराबेकला 4-1 असे नमवत कांस्यपदक पटकावले. भारताचे दिवसभरातील बॉक्सिंगमधील दुसरे पदक ठरले. याशिवाय, भारताची स्टार बॉक्सर लवलिनाने 75 किलो गटात फायनल गाठली आहे. उपांत्य फेरीत तिने नताल्याला पराभूत केले.

कुस्तीत भारताला कांस्य

यंदाच्या एशियन गेम्समध्ये कुस्तीत भारताने कांस्यपदक पटकावले आहे. पुरुषांच्या 87 किलो गटात सुनील कुमारने कांस्यपदकाला गवसणी घातली ओ. त्याने फिलिपिन्सच्या कॅलम रॉबर्टसचा पराभव केला. दरम्यान, 2023 मध्ये होंगझाऊ एशियन गेम्समध्येही सुनीलने कांस्यपदक पटकावले होते. दरम्यान, आशियाई खेळांच्या इतिहासात एकापेक्षा जास्त ग्रीको-रोमन पदके जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.

Advertisement
Tags :

.