For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टॉयलेट भांड्यातून ‘ड्रिंक’ प्या...

06:27 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
टॉयलेट भांड्यातून ‘ड्रिंक’ प्या
Advertisement

सध्याचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे. ही स्पर्धा केवळ नोकरी मिळविण्याचा संदर्भात तर आहेच, अन्य प्रकारच्या अनोख्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. काही स्पर्धा अनेकांना अत्यंत ओंगळवाण्या वाटण्याची शक्यता आहे. तथापि, त्या आयोजित केल्या जातात. सध्या रशियातील एका प्लंबिंग कंपनीने आयोजित केलेली अशीच एक स्पर्धा जगभर चर्चेचा विषय बनली आहे. या स्पर्धेचे नाव ऐकूनच आपल्याला शिसारी असल्याशिवाय राहणार नाही. टॉयलेटच्या भांड्यातून (टॉयलेट बाऊल) ‘ड्रिंक’ पिण्याची ही स्पर्धा आहे. जो किंवा जी स्पर्धक टॉयलेटच्या भांड्यातून विशिष्ट वेळेत जास्तीत जास्त पेयपान करेल, त्याला जवळपास 1 लाख रुपयांचे पारितोषिक निधारीत करण्यात आले आहे. अनेक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. अर्थात, एक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे. की या स्पर्धकांना जे ड्रिंक प्यायचे आहे, ते थेट संडासच्या भांड्यात घातलेले नसते. तर या भांड्यात एक पेला ठेवलेला असतो. त्या पेल्यात हे पेय असते.

Advertisement

ही स्पर्धा रशियाच्या स्टावरोपोल या शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये नुकतेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी टॉयलेट भांड्याच्या आत ठेवलेल्या पेल्यात भरलेले मद्यार्कविहीत पेय नळीने ओढून प्यायचे होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक फेऱ्यांमध्ये ती घ्यावी लागली. प्रत्येक फेरीत जो प्रथम क्रमांक मिळवेल, त्याला पुढच्या फेरीत प्रवेश देण्यात आला. अशा प्रकारे सात स्पर्धक अंतिम फेरीत प्रवेश करते झाले. अंतिम फेरीत त्यांना आणखी एका आव्हानाला तोंड द्यायचे होते. या सर्व सात स्पर्धकांना सात टॉयलेट सीटस् वर बसविण्यात आले आणि जो सर्वाधिक काळ या सीटवर बसून राहील, त्याला पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यांच्यापैकी एकाने साडेदहा तास सलग बसून ही स्पर्धाही जिंकली आहे. ड्रिंक पिण्याची ही स्पर्धा साधारणत: 10 तास चालली. तथापि, विजेत्याचे नाव मात्र घोषित केले गेले नाही.या स्पर्धेला अनेकांनी आक्षेपही घेतला, स्वच्छता आणि शरीराला होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा स्पर्धांना अनुमती देण्यात येयू नये, असे आवाहन अनेकांनी केले. ही स्पर्धा झाली. प्रतिसादही मोठा मिळाला.

Advertisement
Advertisement
Tags :

.