For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ज्ञानेश कुमार यांच्यावरील जुन्या आरोपांची चौकशी

12:41 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानेश कुमार यांच्यावरील जुन्या आरोपांची चौकशी
Advertisement

वृत्तसंस्था/ कोची

Advertisement

केरळमध्ये ज्ञानेश कुमार यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या 20 वर्षे जुन्या आरोपाची चौकशी होणार आहे. केरळचे गृहमंत्री मेश चेन्नीथला यांनी याप्रकरणी दक्षता चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण एका रस्ता बांधकाम प्रकल्पाशी संबंधित आहे. त्यावेळी ज्ञानेश कुमार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव होते. केरळ राज्य परिवहन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पैसे देण्याच्या बदल्यात ज्ञानेश कुमार यांनी 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा कोल्लमचे कंत्राटदार साजन यांचा आरोप आहे. साजन यांनी अंदाजे 17 कोटी रुपयांच्या निधीची कामे पूर्ण केली होती, परंतु ज्ञानेश कुमार यांनी धनादेश देणे थांबवल्यामुळे  कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागल्याचा दावा करण्यात आला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.