For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जुन्या 'चीता‑चेतक' हेलिकॉप्टरची होणार सुटी !

06:04 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
जुन्या  चीता‑चेतक  हेलिकॉप्टरची होणार सुटी
Advertisement

भारत खरेदी करणार 200 स्वदेशी हेलिकॉप्टर : सियाचीनपासून अऊणाचलपर्यंत लष्करी ताकद वाढणार

Advertisement

भारतीय सैन्य आणि वायुदलातील जुन्या चीता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा आता आधुनिक हेलिकॉप्टर घेणार आहेत. यासाठी सुमारे 200 हलक्मया बहुउद्देशीय हेलिकॉप्टरच्या खरेदीची तयारी सुरू आहे. संरक्षण मंत्रालयाने या खरेदीसाठी सुमारे 20 हजार कोटी ऊपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) स्वदेशी हेलिकॉप्टर विकसित करत असून, या प्रकल्पामुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

चीता आणि चेतक हेलिकॉप्टर अनेक दशकांपासून भारतीय सशस्त्र दलांच्या सेवेत आहेत. मात्र, बदलत्या लष्करी गरजा आणि जुन्या ताफ्याच्या जागी आधुनिक हेलिकॉप्टर आणण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन खरेदीची प्रक्रिया पुढे नेली जात आहे.

संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कर आणि वायु दलाला एकूण सुमारे 400 हलक्मया हेलिकॉप्टरची गरज आहे. त्यामुळे जुन्या हेलिकॉप्टरना टप्प्याटप्प्याने सेवेतून हटवण्याची योजना आहे.

एचएएलकडून स्वदेशी हेलिकॉप्टरची निर्मिती

एचएएलने आतापर्यंत 12 लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयुएच) तयार केले आहेत. आणखी 187 हेलिकॉप्टरच्या ऑर्डरची प्रक्रिया पुढे गेल्यास या प्रकारच्या हेलिकॉप्टरची एकूण संख्या 199 होईल. दुसरीकडे, 200 लाइट मल्टीरोल हेलिकॉप्टरच्या खरेदी प्रक्रियेत खासगी कंपन्यांनाही सहभागी होण्याची संधी मिळू शकते. निविदेतील पात्र बोलीदार आणि अंतिम कराराच्या अटींनुसार खरेदीचे वाटप निश्चित होईल.

टाटा, अदानी आणि परदेशी कंपन्यांचीही स्पर्धा?

या प्रकल्पात भारतीय कंपन्या परदेशी हेलिकॉप्टर उत्पादकांसोबत भागीदारी करू शकतात. टाटा समूह युरोपातील एअरबससोबत, तर अदानी समूह इटलीच्या लिओनार्डो कंपनीसोबत सहभागी होण्याची तयारी करत आहे. अमेरिकेची बेल हेलिकॉप्टर्स कंपनीही या खरेदी प्रक्रियेत आपले हेलिकॉप्टर सादर करू शकते. मात्र, अंतिम निवड आणि करारांचे वाटप निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

एलयुएच हेलिकॉप्टरची वैशिष्ट्यो काय?

एचएएलचे लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर हे सुमारे तीन टन वजनाच्या श्रेणीतील आधुनिक हेलिकॉप्टर आहे. दुर्गम आणि उंच पर्वतीय भागांतील लष्करी गरजा लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे.

या हेलिकॉप्टरचा उपयोग टेहळणी, संपर्क मोहिमा, सैनिकांची वाहतूक आणि दुर्गम भागांत आवश्यक सामग्री पोहोचवण्यासाठी होऊ शकतो.

सियाचीनपासून अऊणाचलपर्यंत सामरिक क्षमता वाढणार

सियाचीनसारख्या अतिउंच हिमालयीन भागांपासून अऊणाचल प्रदेशातील सीमावर्ती प्रदेशांपर्यंत हेलिकॉप्टरची भूमिका महत्त्वाची आहे. प्रतिकूल हवामान, उंच पर्वत आणि मर्यादित जागा अशा परिस्थितीत सैनिकांची वाहतूक करणे, रसद पोहोचवणे आणि टेहळणी करणे यासाठी हलकी हेलिकॉप्टर उपयुक्त ठरतात. नवीन हेलिकॉप्टरचा ताफा उपलब्ध झाल्यास जुन्या यंत्रणेवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि लष्कराच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास मदत होऊ शकते.

स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना

या खरेदीमुळे एचएएलसह देशांतर्गत संरक्षण उद्योगातील कंपन्यांना संधी मिळण्याची शक्मयता आहे. परदेशी उत्पादकांसोबत भागीदारी झाल्यास तंत्रज्ञान, उत्पादन आणि पुरवठा साखळीच्या क्षेत्रातही सहकार्य वाढू शकते.

Advertisement
Tags :

.